चालकानेच पळविला ट्रक

By Admin | Updated: July 9, 2014 00:29 IST2014-07-09T00:11:54+5:302014-07-09T00:29:41+5:30

येणेगूर : ट्रकसह ३१ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणात फिर्यादी चालकाचाच हात असल्याचे समोर आले

The driver ran the truck | चालकानेच पळविला ट्रक

चालकानेच पळविला ट्रक

येणेगूर : ट्रकसह ३१ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणात फिर्यादी चालकाचाच हात असल्याचे समोर आले असून, मुरूम पोलिसांनी आठ दिवसातच चोरीचा छडा लावला आहे़ पोलिसांनी शनिवारी चालकासह मुद्देमाल जप्त केला़
पोलिसांनी सांगितले की, उमरगा तालुक्यातील आष्टामोड नजीक ढाब्यावर लावलेली ट्रक (क्ऱएम़एच़२५/ यू ७५७६) ही मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद चालक युसूफ बशीर विजापुरे (राग़ुंजोटी ता़उमरगा) याने दिली होती़ त्यात ट्रकसह जवळपास ३१ लाख रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते़ तक्रार दाखल झाल्यानंतर मुरूम पोलिस ठाण्याचे सपोनि एस़पी़शिरसाट यांनी सहकारी धनू चव्हाण, अनिल जोशी, किरण औताडे, चालक विनायक गायकवाड यांच्यासह तपासाची चक्रे वेगाने फिरविली़ फिर्यादी विजापुरे याच्या संशयास्पद हालचालींमुळे त्याच्यावरच पोलिसांचा संशय बळावला़ त्यास ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखविताच त्याने कट रचून ट्रक लंपास केल्याची माहिती दिली़ त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आळंद तालुक्यातील खंडाळा या गावात लावलेला ट्रक मुद्देमालासह जप्त केला़ चालकाने बॅटरीसाठी लागणारे शिसे परस्पर विकून पैसे हडप करण्याचा प्रयत्न पोलिसांनी तक्रार दाखल होताच आठ दिवसात हाणून पाडला़ पुढील तपास सपोनि शिरसाट हे करीत आहेत़

महिलेचा मृत्यू
येणेगूर : राजेश गिरी याची पत्नी वसंती ही स्टोव्हवर स्वयंपाक करताना अचानक स्टोव्हचा भडका उडाल्याने गंभीररीत्या भाजली. सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. ही घटना ८ जून रोजी घडली होती. सोलापूर सदर बजार पोलीस चौकीतून शुन्य क्रमांकाने दाखल करण्यात आला होता. मात्र आकस्मिक मृत्यूची नोंद मुरूम पोलीस ठाण्यास प्राप्त होण्यास महिन्याचा कालावधी लागला असून, सोमवारी या प्रकरणातील महिलेच्या मृत्यूची नोंद मुरूम पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. राजेश गिरी हे मूळचे नेपाळ येथील असून, येथे ते गुरखा म्हणून काम पाहतात.

Web Title: The driver ran the truck