शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न राहिले अधुरेच !

By admin | Updated: June 6, 2014 01:04 IST

व्यंकटेश वैष्णव, बीड बीडचे भूमिपुत्र गोपीनाथराव मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना विकासाचे व्हिजन तयार केले होते़

व्यंकटेश वैष्णव, बीडबीडचे भूमिपुत्र गोपीनाथराव मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना विकासाचे व्हिजन तयार केले होते़ जिल्ह्याच्या विकासासंदर्भात केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव टी. विजयकुमार यांची बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी बैठक निश्चित केली होती. ही बैठक सात जूनला होणार होती. मात्र मुंडे यांच्या अकाली निधनामुळे सगळ्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे.२६ मे रोजी गोपीनाथ मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे ग्रमाविकास खात्याची जबाबदारी देण्यात आली. पदभार स्विकारल्या नंतर मुंडे हे सतत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी दुरध्वनी वरून संवाद साधायचे. बीड जिल्ह्यातील ग्रामीण विकासाच्या संदर्भात कोणत्या योजनांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. आज स्थितीत पाणी पुरवठा संदर्भात काय करायचे याबाबत चर्चा होत होती. जिल्हाधिकारी राम यांनी देखील गोपीनाथ मुंडे यांना आठ दिवसापूर्वीच बीड जिल्ह्यात प्राधान्याने राबवाव्या लागणार्‍या योजनांचा आराखडा दिला होता. मात्र ३ जून रोजी सकाळी मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आणि होत्याचे नव्हते झाले.निधनाच्या एक - दोन दिवसापुर्वीच मुंडे यांनी जिल्हाधिकारी राम यांच्याशी दुरध्वनीवरून अर्धातास चर्चा केली. यावेळी बीड जिल्ह्यातून होत असलेले मजूरांचे स्थलांतर यासाठी तात्काळ कुठली योजना राबविता येऊ शकते., त्याच बरोबर नरेगा च्या माध्यमातून गावांमध्ये शौचालये उभारणी, पाणी पुरवठा योजनेला गती देण्यासंबधी चर्चा झाली. या योजना तात्काळ राबविण्याचे देखील मुंडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना बोलून दाखवल्या. मुंडे साहेबांनी सांगितलेल्या योजनांवर जिल्हाधिकारी यांनी काम करण्यास सुरूवात देखील केली होती. असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.मुंडे यांनी सुचविलेल्या कामांना प्राधान्यग्रामविकास पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील ग्रामीण विकासाच्या विविध योजनांवर माझ्याशी चर्चा केलेली आहे. मुंडे यांच्या निधनाच्या एक दिवस अगोदर पर्यंत ते माझ्याशी दुरध्वनीवर बोलले आहेत. त्यांनी बोलून दाखविलेल्या सर्व योजनांना मी प्राधान्य देणार आहे, असे राम यांनी सांगितले.