शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मोफत प्रवेशासाठी शिक्षण विभाग काढणार ‘ड्रॉ’

By admin | Updated: May 20, 2015 00:19 IST

बीड : विशिष्ट शाळांमध्ये प्रवेशासाठी आग्रह होत असल्याने २५ टक्के प्रवेशाचा लाभ देताना शाळा व्यवस्थापनाची कसरत होते. त्यामुळे आता तालुका पातळीवरून नियंत्रण केले जाणार आहे

बीड : विशिष्ट शाळांमध्ये प्रवेशासाठी आग्रह होत असल्याने २५ टक्के प्रवेशाचा लाभ देताना शाळा व्यवस्थापनाची कसरत होते. त्यामुळे आता तालुका पातळीवरून नियंत्रण केले जाणार आहे. काही शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी क्षमतेपेक्षा जादा अर्ज आले तर जि. प. शिक्षण विभाग सोडत (ड्रॉ) पध्दतीने प्रवेश देणार आहे.जिल्ह्यात कायम विनाअनुदानित शाळांची संख्या १३१ एवढी आहे. या संस्थांमध्ये पहिल्याच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या एकूण बालकांच्या २५ टक्के मोफत प्रवेशाचे शुल्क शासन अदा करणार आहे. जिल्हा परिषद, विना अनुदानित, अनुदानित शाळांमध्ये देखील २५ टक्के मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. मात्र, त्याचे प्रवेश शुल्क शासन देणार नाही.दरम्यान, विशिष्ट शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा ओढा असल्यामुळे मागील दोन वर्षांमध्ये कायम विनाअनुदानित शाळांमध्ये निम्म्याच विद्यार्थ्यांचे मोफत प्रवेश झाले आहेत. २०१३-१४ मध्ये केवळ ३९ शाळांमध्ये ३१६ तर २०१४-१५ मध्ये ७० शाळांमध्ये ५०६ बालकांचे प्रवेश २५ टक्के कोट्यातून झाले.वास्तविक पाहता १३१ शाळांमध्ये पहिल्याच्या वर्गात २५ टक्के मोफत प्रवेशाचा लाभ घेता येतो. मात्र, विशिष्ट शाळांची मागणी असल्याने मोफत प्रवेश कोट्याच्या जागा रिक्त राहत आहेत. तीन वर्षांपासून मोफत प्रवेश शुल्क शासनाकडून अदा करण्यात आलेले नाही. मात्र, शिक्षण विभागाने कायम विनाअनुदानित शाळांना राष्ट्रीयीकृत बँकांना आरटीईचे स्वतंत्र खाते उघडण्याचे आदेश दिले आहेत. या खात्यावर मोफत प्रवेशाचे शुल्क वर्ग करण्यात येणार आहे.शिक्षण विभाग सज्जजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २५ टक्के मोफत प्रवेशाचा लाभ देण्यासाठी मार्च महिन्यापासूनच तयारी केली आहे. अंबाजोगाई येथील गोदावरी कुंकुलोळ व बीड येथील गुरूकूल इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापकांची बैठक घेऊन प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्रा.) सुखदेव सानप यांनी दिली.जनजागृतीवर भरआरटीई अ‍ॅक्टनुसार पहिल्या वर्गात २५ टक्के मोफत प्रवेशाचा लाभ देण्यासाठी १ ते १५ जून दरम्यान जनजागृती केली जाणार आहे. १५ ते ३० जून या कालावधीत प्रवेश देऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शिक्षण संचालकांना अहवाल पाठविण्यात येईल, असे शिक्षण विस्तार अधिकारी जी. एन. चोपडे यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)