शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. दाभोलकर खून खटल्यात अटकेतील रोहित रेगेची खंडपीठात जामिनावर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:15 IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यात शस्त्र बाळगल्यासंबंधी अटकेत असलेला रोहित रेगे याचे नाव दोषारोपपत्रात नसल्याचे पत्र सीबीआयने सरकारी वकिलामार्फत औरंगाबाद खंडपीठात सादर केले. त्यानंतर न्या. मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने रोहितची ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर, महिन्याच्या पहिल्या सोमवारी संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर बुधवारी (दि.९) जामीन मंजूर केला.

औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यात शस्त्र बाळगल्यासंबंधी अटकेत असलेला रोहित रेगे याचे नाव दोषारोपपत्रात नसल्याचे पत्र सीबीआयने सरकारी वकिलामार्फत औरंगाबाद खंडपीठात सादर केले. त्यानंतर न्या. मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने रोहितची ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर, महिन्याच्या पहिल्या सोमवारी संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर बुधवारी (दि.९) जामीन मंजूर केला.यासंदर्भात सीबीआयचे उपअधीक्षक (बेलापूर, नवी मुंबई) मारुती शंकर पाटील यांनी २२ आॅगस्ट २०१८ रोजी तक्रार दिली होती. दाभोलकर हत्येच्या गुन्ह्यात सीबीआयने प्रथम सचिन अंदुरे याला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याने लपविण्यासाठी दिलेली शस्त्रे शुभम व अजिंक्य सुरळे यांच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानुसार सीबीआयने सुरळे बंधूना अटक केली असता त्यांनी सदरील शस्त्रे रोहित राजेश रेगे (२०, रा. धावणी मोहल्ला) याच्याकडे दिल्याचे सांगितले. त्यानुसार २२ आॅगस्ट २०१८ रोजी सीबीआयने रोहितच्या घरी छापा मारून घराच्या गच्चीवरील एका पोत्यातून तलवार, पिस्तूल, तीन काडतुसे, एअरगन व दोन मोबाईल जप्त केले. सीबीआयने तिघा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात आर्म्स अ‍ॅक्टचे कलम ३,४ व ५ खाली गुन्हा दाखल केला.रोहित रेगेला २२ ते २७ आॅगस्ट २०१८ पर्यंत पोलीस कोठडी, नंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर रेगेने अ‍ॅड. नीलेश घाणेकर यांच्यामार्फत नियमित जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.याचिकेच्या सुनावणीच्या वेळी अ‍ॅड.घाणेकर यांनी दाभोलकर हत्येशी रोहितचा संबंध नाही. आरोपीचा दाभोलकर हत्येशी संबंध आहे का, याचा तपास करण्यासाठी न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतरही रेगे विरुद्ध संबंध असल्याचा पुरावा मिळाला नाही. २०१३ मध्ये दाभोलकर यांची हत्या झाली, त्यावेळी रोहित १५ वर्षांचा होता, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ३१ डिसेंबर २०१८ रोजी सीबीआयने पत्र पाठवून रोहितचा दाभोलकर हत्याप्रकरणी संबंध नसल्याचे सांगितले. या पत्राआधारे खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.सरकारतर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सुनील सोनपावले यांनी काम पाहिले. रेगेतर्फे अ‍ॅड. नीलेश घाणेकर व वर्षा घाणेकर (वाघचौरे) यांनी काम पाहिले. त्यांना कुलदीप कहाळकर व धनराज हिंगोले यांनी सहकार्य केले.-----

टॅग्स :Courtन्यायालय