शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलसाई मंदिरातील दानपेट्या पळविल्या

By admin | Updated: January 12, 2015 14:16 IST

लोहारा तालुक्यातील दस्तापूर नजीक रस्त्याच्या कडेला असलेल्या विठ्ठलसाई मंदिरातील दोन दानपेट्या चोरट्यांनी लंपास केल्या.

येणेगूर : लोहारा तालुक्यातील दस्तापूर नजीक रस्त्याच्या कडेला असलेल्या विठ्ठलसाई मंदिरातील दोन दानपेट्या चोरट्यांनी लंपास केल्या. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली असून, मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.मिळालेल्या माहितीनुसार, तुगाव येथील दिलीप माने यांनी दस्तापूर नजीकच्या शिवारात विठ्ठलसाई मंदीराची उभारणी केली आहे. या मंदिराच्या बाजूला महामार्गअसल्याने अनेक भाविक येथे दर्शनासाठी थांबतात. मंदिराचे पुजारी दिनकर पंडीत आचार्य (रा.निटूर ह.मु. दस्तापूर) हे शनिवारी नित्योपचार पूजा झाल्यानंतर दानपेट्या गाभार्‍यात ठेवून कुलूप लावून घराकडे गेले होते. दिनकर आचार्य हे रविवारी सकाळी मंदिरात आले असता गाभार्‍याचा कडीकोंडा तोडून दानपेट्या चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले. या घटनेची माहिती मिळताच मुरूम पोलीस ठाण्याचे सपोनि विलास गोबाडे, पोउपनि मनोज जिरगे, पोहेकॉगोरोबा कदम, मनोज जगताप आदीनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा सुरू केला होता. पेट्यांचा शोध घेतला असता नजीकच्या उसाच्या फडात दोन्ही पेट्या फोडल्याच्या अवस्थेत आढळून आल्या असून, आतील रक्कम लंपास करण्यात आली आहे. पोलिसांनी दुपारी तपासासाठी सोलापूर येथील श्‍वान पथकास पाचरण केले केले असून, तपास सुरू असल्याचे सपोनि विलास गोबाडे यांनी सांगितले. या गुन्ह्याची मुरूम पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ गोरोबा कदम हे करीत आहेत. (वार्ताहर)