शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

डॉग स्क्वॉडने वाढविली शान

By admin | Updated: January 29, 2015 01:16 IST

शिरीष शिंदे , बीड पोलीस दलात अधिकारी, कर्मचारी कार्य करताना त्यांच्याकडून चुका होतात. काही व्यक्तींच्या अयोग्य वर्तणुुकीमुळे ‘खाकी’वर्दी डागाळत चालली आहे

शिरीष शिंदे , बीडपोलीस दलात अधिकारी, कर्मचारी कार्य करताना त्यांच्याकडून चुका होतात. काही व्यक्तींच्या अयोग्य वर्तणुुकीमुळे ‘खाकी’वर्दी डागाळत चालली आहे मात्र अशा परिस्थितीत डॉग आपली ड्युटी इमानेइतबारे बजावत असून तपासाला गती देण्याचे काम खऱ्या अर्थाने केले जात आहे. कोणत्याही ठिकाणी चोरी, दरोडा अथवा एखाद्या ठिकाणी बॉम्ब असल्याची माहिती मिळताच सर्वात प्रथम पाचारण करण्यात येते ते डॉग स्कॉडचे. गुन्ह्यादरम्यान आरोपीने वापरलेल्या वस्तुंचा वास डॉगला देऊन आरोपीचा माग काढून प्रत्यक्षरित्या तपासाला सुरुवात होते. त्यानंतरच गुन्ह्याच्या तपासाला खऱ्या अर्थाने गती मिळते. मात्र आरोपी निष्पन्न झाल्यानंतर डॉग स्कॉडचा विसर तपासी अधिकाऱ्यांना पडतो हे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या पहाणीत समोर आले. जिल्ह्यासाठी स्वतंत्र डॉग स्कॉड असून ते २०१०-११ साली सुरु झाले. सदरील स्कॉडच्या कार्यालयाचे उद्घाटन १ जानेवारी २०११ साली झाले असले तरी त्याचे काम २०१० पासूनच सुरु होते. गुन्हा घडल्यानंतर आरोपीने तपासादरम्यान वापरलेल्या वस्तुचा वास डॉगला देऊन तो कोणत्या दिशेने गेला आहे याची अचूक माहिती डॉगच देऊ शकतो हे यापूर्वी सिद्ध झाल्याने राज्य शासनाने डॉग स्कॉडला मंजुरी दिली आहे. बीड सारख्या जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असल्याने चार डॉगद्वारे तपासांचे काम पूर्ण केले जात आहे. चार श्वान व आठ ट्रेनरबीडच्या श्वान पथकामध्ये एकूण चार डॉग असून त्यांच्यावर नियंत्रणासाठी आठ ट्रेनरची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व कर्मचारी पोउपनि मधुकर चांदेकर यांच्या देखरेखीखाली काम करतात. गुन्हे शोधक पथकाचे पोलीस कर्मचारी संयज खाडे व ज्ञानेश्वर वख्रे हे डॉनचे ट्रेनर आहेत. तर रॉकीचे नितीन येवले, बाबासाहेब तुपे ट्रेनर आहेत. बॉम्ब शोधक पथकातील मार्शल नामक श्वानांचे शिवराम घोंगडे व विनायक जाधव तर जानी या नाकम श्वानाचे शरद सानप व सचिन गायकवाड हे ट्रेनर आहेत. श्वानांना ट्रेनर दिलेल्या आॅर्डरच्या सूचना कळतात. इतर कोणत्या व्यक्तीने दिलेल्या सुचना तो पाळत नाही. असा प्रयत्नही केला तर डॉग अंगावर धाऊन जातात. मुळात कुत्रा हा इमानदार प्राणी असल्यामुळेच त्याचा पोलीस खात्यात समावेश करण्यात आला आहे. अनेक गुन्ह्यांत मार्ग दाखविला२०१२ मध्ये अंबाजोगाई येथील योगेश्वरी मंदीरात चोरी झाली होती. आरोपीनी चोरी दरम्यान वापरलेले साहित्य दीड किलो मिटर अंतरावर नेऊन फेकून दिले होते. त्यावेळी श्वान पथकातील डॉगन माग काढत हे साहित्य पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यात चोरी झाली होती. त्यावेळी उस्मानाबाद श्वान पथकातील श्वान आजारी असल्याने बीड श्वान पथकाला बोलाविण्यात आले होते. पथकातील मार्शलने माग काढत थेट तीन आरोपीच्या घरासमोर जाऊन पोहोचला होता. पाटोदा येथे एका न्यायाधिशांच्या घरी चोरी झाली होती. चोरी करणाऱ्या आरोपीपर्यंत श्वान जाऊन पोहोचला होता. बीड शहरातील माळीवेस भागातील एका दुकानात बंदुकीच्या धाकावर लाखो रुपयांची चोरी झाली होती. पथकातील डॉगने शाम आठवले याच्या घराच्या दिशेने मार्गक्रमण केले होते. या गुन्ह्या दरम्यान माकड टोपीवरुन श्वानने मार्गक्रमण केले होते. परळी तालुक्यात एका पोलिसाचा खून झाला होता. त्यावेळी श्वानने माग काढत झोपडपट्टीत प्रवेश करीत आरोपीच्या घरापर्यंत जाऊन पोहोचला होता. ७२ तासात केली पाहिजे तपासणी गुन्हा घडल्यानंतर आरोपीने वापरलेल्या वस्तुचा वास ७२ तासानंतर राहत नाही. त्यामुळे श्वान पथकाद्वारे घटनस्थळाची तात्काळ तपासणी केली जाते. पोलीस दलातील तपासासाठी श्वानांचे महत्व अधिक आहे. ‘डॉग इज गॉड आॅफ बीडीडीएस’ म्हणजेच श्वान हा बॉम्ब शोधक पथकासाठी देव आहे असे मोठ्या आदराने म्हटले जाते. एखाद्या ठिकाणी बॉम्ब आहे की नाही हे सागणे तंत्रज्ञान व शास्त्रज्ञही सांगणे कठीण बनते त्या ठिकाणी श्वान अतिशय खात्रीशिरपणे सूचकपणे हे सांगु शकतो. त्यामुळे आजही श्वान पथकाच्या मार्गदर्शनानुसार कामाला सुरुवात होते व त्यांच्यामुळेच गुन्ह्याची उकल होते हे तपासी अधिकाऱ्यांना मान्यच करावे लागेल.श्वान पथकाचे कार्य अत्यंत उत्कृष्ट आहे़ गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या चांगल्या कामाचा आलेख वाढत आहे़ तपास कामामध्ये श्वान पथकाचा लाभ होत आहे़ त्याची दखल विशेष महानिरीक्षक यांनी घेतली आहे़- नवीनचंद्र रेड्डी , पोलीस अधीक्षक