शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

दुखणे डॉक्टरचे; ‘ताप’ आरोग्य विभागाला!

By admin | Updated: January 29, 2015 01:15 IST

संजय तिपाले , बीड रुग्णांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी नेमलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याचेच आरोग्य ठीकठाक आहे की नाही? या भलत्याच चिंतेने जिल्हा परिषद प्रशासनाचा ‘ताप’ सध्या वाढला आहे

संजय तिपाले , बीडरुग्णांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी नेमलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याचेच आरोग्य ठीकठाक आहे की नाही? या भलत्याच चिंतेने जिल्हा परिषद प्रशासनाचा ‘ताप’ सध्या वाढला आहे. ‘उपचार नको, डॉक्टर आवर’ या गावकऱ्यांच्या तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर आरोग्य विभागाने संबंधित अधिकाऱ्याला ‘बुस्टरडोस’ देऊन ‘दुखण्या’तून बाहेर काढता येते का? याची चाचपणी सुरु केली आहे.उपचाराची गरज भासली ते वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत गेवराई तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर! पाच वर्षांपूर्वी ते तेथे रुजू झाले. तेंव्हापासून त्यांच्या ‘तऱ्हा’ कर्मचाऱ्यांसह गावकऱ्यांनाही नित्याच्या झाल्या आहेत. कधी आरोग्य केंद्राला स्वत: टाळे ठोकणे, कधी वाहनाची चावी घेऊन जाणे तर कधी रुग्णांवरच खेकसणे... या विचित्र वागण्यामुळे केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही रोडावली आहे. अडला - नडला रुग्ण उपचारासाठी गेलाच तर त्याच्यावर उपचार होतील की नाही? याची शंका असते. त्यामुळे गावकऱ्यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या. त्यानंतर आता जिल्हा परिषदेने संबंधित डॉक्टरच्या आरोग्याची तपासणीची मोहीम हाती घेतली आहे.१२ मे २०१२ रोजी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र पाठवून संबंधित वैद्यकीय अधिकारी तपासणीसाठी येरवडा येथे गेलेच नाही, असे कळविले होते. पुन्हा गावकऱ्यांच्या तक्रारींचा ओघ सुरु झाल्याने आरोग्य विभागाने त्यांच्या तपासणीच्या हालचाली आहेत.चार वर्षांपूर्वी आरोग्य केंद्रातून पंखा चोरीला गेला होता, तेंव्हापासून हे डॉक्टर महाशय रात्री मुख्यालयावरील घरी जाताना केंद्राला टाळे लावतात. शासकीय वाहनातून बैठकीसाठी बाहेरगावी गेल्यावर चालकाला खाली उतरवून गाडीची चावीही ते स्वत:कडे ठेवतात. पंखा चोरीपासून त्यांनी घेतलेला ‘धडा’ त्यांच्या आरोग्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.