शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

धीर सोडू नका... अनुदानाचा लाभ घ्या !

By admin | Updated: April 17, 2015 00:43 IST

बीड : गतआठवड्यात बरसलेल्या अवकाळीच्या तडाख्याने फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अगोदरही पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून

बीड : गतआठवड्यात बरसलेल्या अवकाळीच्या तडाख्याने फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अगोदरही पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून आता फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे बळीराजाने अनुदान पदरात पाडून घेणे महत्त्वाचे असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक आर.एस. भताने यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.नुकसानीची तीव्रता लक्षात घेता नुकसान क्षेत्राच्या अनुमानामध्ये बदल करण्यात आला असून दर हेक्टरीच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. यापुर्वी ५० टक्के पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळत होती. यामध्ये बदल करून ३३ टक्के नुकसान झाल्यासही शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. तर दर हेक्टरी ४५०० रुपये मिळणाऱ्या रकमेत बदल करण्यात आला असून आता ६८०० रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहेत. नुकसानीची तीव्रता अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहे. त्या अनुषंगाने पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून गुरूवारपर्यंत १७०० हेक्टर बागांच्या नुकसानीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. अवकाळी हा शेतकऱ्यांच्या जीवावर बेतला असून याचा सामना करण्यासाठी उर्वरित फळबागांची काळजी घेणे आवश्यक आहे. खरीप हंगाम सुरू होण्यास तीन महिन्याचा अवकाश आहे. कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना इतर पिके घेणे शक्य नाही. त्यामुळे उर्वरीत काळात शेतीची योग्य प्रकारे मशागत करून संकटामुळे कोलमोडून न जाता पुन्हा जोमाने कामला सुरवात करणे महत्वाचे आहे. याकरिता उताराला आडवी नांगरणीतून मशागत करून जलसंधारणेचे काम करावे असे आवाहनही जिल्हा कृषि अधीक्षक रमेश भताने यांनी केले आहे. (प्रतिनिधी)