शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज न देताच सातबाऱ्यावर बोजा

By admin | Updated: August 27, 2014 00:14 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद तालुक्यातील पांढरी पिंपळगाव येथील एका शेतकऱ्याला बँकेने पीककर्ज मंजूर केले.

सुनील कच्छवे, औरंगाबादतालुक्यातील पांढरी पिंपळगाव येथील एका शेतकऱ्याला बँकेने पीककर्ज मंजूर केले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या सातबाऱ्यावर एक लाख रुपयांचा बोजाही टाकला; पण चार महिने उलटले तरी त्याला कर्ज मात्र मिळालेले नाही. त्यामुळे हा शेतकरी बँकेत दररोज खेट्या घालत आहे.लक्ष्मण तोताराम घुनावत, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पांढरी पिंपळगाव येथे घुनावत यांची सहा एकर शेती आहे. त्यांनी एप्रिल महिन्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या चित्तेपिंपळगाव येथील शाखेत पीककर्जाची मागणी केली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी एक लाख रुपयांचे पीककर्ज देण्याची तयारी दर्शविली. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर बँकेने त्यांना एक लाख रुपयांचे पीककर्ज मंजूर केले. बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने सातबाऱ्यावर बोजा टाकून आणण्यासाठी पत्र दिले. हे पत्र दाखविल्यानंतर तलाठ्याने घुनावत यांच्या सातबाऱ्यावर एक लाख रुपयांच्या कर्जाचा बोजा टाकला; पण तरीही घुनावत यांना प्रत्यक्षात कर्जाची रक्कम मात्र मिळाली नाही. पुढे काही दिवसांतच बँकेचा शाखा व्यवस्थापक बदलून गेला. त्याजागी आलेल्या शाखा व्यवस्थापकाने घुनावत यांना महिनाभर थांबण्याचा सल्ला दिला; परंतु महिना उलटूनही कर्ज मिळाले नाही. त्यामुळे खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यास खाजगी व्यक्तीकडून हातउसने पैसे घेऊन पेरणी करावी लागली. निदान आता तरी पीककर्जाची रक्कम मिळेल आणि हातउसने घेतलेल्या पैशांची परतफेड करता येईल, असे वाटत होते; पण त्यानंतरही बँकेकडून मंजूर कर्जाचे पैसे देण्यास टाळाटाळ सुरूच राहिली. आता तब्बल चार महिने उलटले तरी मंजूर कर्जाचे पैसे न मिळाल्याने घुनावत यांनी बँकेच्या औरंगाबादेतील विभागीय कार्यालयात धाव घेतली आहे.