शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींच्या नावाने मतांचा जोगवा मागू नका

By admin | Updated: October 7, 2014 00:12 IST

वसमत : विधानसभा निवडणुकीत मते मागण्यासाठी मोदी छत्रपतींच्या नावाचा वापर करत आहेत. ते योग्य नाही. मतांचा जोगवा मागण्यासाठी छत्रपतींचे नाव वापरू नका,

वसमत : विधानसभा निवडणुकीत मते मागण्यासाठी मोदी छत्रपतींच्या नावाचा वापर करत आहेत. ते योग्य नाही. मतांचा जोगवा मागण्यासाठी छत्रपतींचे नाव वापरू नका, तर स्वत:चे कर्तव्य व काम जनतेला सांगा, असे खडे बोल माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी वसमत येथील जाहीर सभेत भाजपाला सुनावले. राष्ट्रवादीचे उमेदवार आ. जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ येथे सोमवारी शरद पवार यांची जाहीर सभा झाली.सभेत पवार यांनी मोदी व केंद्र शासनाच्या धोरणावर कडाडून टीका केली. अच्छे दिन, अच्छे दिन म्हणून मते मागितली. आता कोठे गेले अच्छे दिन, असा सवाल करत जनतेची फसवणूक झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले. मोदी पंतप्रधान झाल्यापासून शेतीमालाचे दर झपाट्याने उतरले. शेतकरी त्रस्त झाला आहे. सोयाबीन, कापूस यांचे दर घसरले. पाकिस्तान आपल्या देशात घुसून आक्रमण करतो आहे. आपले सैनिक प्राण गमावत आहेत. त्याची फिकीर पंतप्रधानांना नाही, तर ते मते मागण्यासाठी लोहा येथे येण्यास प्राधान्य देत असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली. देशाच्या पंतप्रधानांना झोपेतही मीच दिसतो म्हणून ते जागोजागी माझ्या विरोधात बोलतात, अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी आम्ही शून्य टक्के दराने कर्ज दिले. अन्नसुरक्षा कायदा केला. शेतीमालाला वाढीव दर कसा मिळेल यावरच लक्ष केंद्रित केले. महाराष्ट्राचा शेतकरी वाचला पाहिजे. शेतकरी वाचवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. यासाठी राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत द्या, असे आवाहनही त्यांनी केले. आ. दांडेगावकर हे विकास करणारे नेतृत्व आहे. त्यांच्या मागे उभे रहा. अ‍ॅड. शिवाजीराव जाधव यांनी भाजपाकडून उभे राहण्याचा निर्णय आश्चर्यकारक आहे. त्यांचे हे वागणं बरं नव्हे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. सभेत मार्गदर्शन करताना आ. जयप्रकाश दांडेगावकर यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. कोणत्याही विकासाचा अनुभव व विकास काम नावावर नसतानाही मतदान मागण्यासाठी कसे येता? असा सवाल त्यांनी केला. (वार्ताहर)