शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा वाहतूक शाखेचे विभाजन

By admin | Updated: August 12, 2015 00:57 IST

जालना : शहरासह जिल्ह्यातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वाहतूक शाखेचा तीन उपविभागांत विभाजन करण्याचा निर्णय घेतला असून,

जालना : शहरासह जिल्ह्यातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वाहतूक शाखेचा तीन उपविभागांत विभाजन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र अगोदरच वाहतूक शाखेत मान्यतेच्या ५० टक्केच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात विभाजन करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची वानवा निर्माण होणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे.जालना शहरासह जिल्ह्यातील तालुकास्थानी असलेल्या शहरात दिवसेंदिवस वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. जालना शहरात तर दररोज वाहतुकीचा प्रश्न भेडसावत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी मागील आठवड्यात वाहतूक शाखेचा तीन विभागांत विभाजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार जालना, परतूर, अंबड-भोकरदन या उपविभागात विभाजन करण्यात आले. जिल्हा वाहतूक शाखेची जबाबदारी पोलीस निरीक्षक शेवगण यांच्यावर देण्यात आली. हे तिन्ही विभाग कार्यरत करण्यात आल्याने परतूर उपविभागासाठी पोलिस निरीक्षक शेवगण यांच्याकडे अतिरिक्त भार देण्यात आला. पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्याकडे अंबड- भोकरदन उपविभागाचा पदभार देण्यात आला. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिष पाटील यांच्याकडे परतूर व जालन्याचा पदभार देण्यात आला. यातील पोलीस निरीक्षक राऊत यांनी पदभार घेतला आहे. मात्र सपोनि पाटील यांनी अद्यापपर्यंत वाहतूक शाखेच्या उपविभागाचा पदभार घेतला नसल्याचे समजते. वाहतूक शाखेच्या तीनही उपविभागात त्या- त्या ठाण्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात येणार आहे. शिवाय पोलिस प्रशिक्षण झालेले ४७ कर्मचारी आहेत. ते सध्या नाशिक येथील कुंभमेळाव्यास बंदोबस्तासाठी आहे. ते तेथून परतल्यास त्यातील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्याही वाहतूक शाखेत करण्यात येणार आहे. वाहतूक शाखेत पुरेसे मनुष्यबळ देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.जालन्यातील वाहतूक शाखेला ६० कर्मचारी संख्या मंजूर आहे. मात्र प्रत्यक्षात ३९ कर्मचारीच वाहतूक शाखेला देण्यात आले. त्यात पोालिस निरीक्षक दोन, उपनिरीक्षक ६, हे. कॉ. १०, नायक पो. कॉ १०, महिला कॉ ६ , पो.कॉ ५ या प्रमाणे मनुष्यबळ आहेत. शहरात वाहतुक शाखेचे बस स्थानक, वीर सावरकर चौक, पाणीवेस, जर्नादन मामा चौक, मुथा बिल्डींग, शनिमंदिर, अंबड चौफुली असे सुमारे ३० पॉइंट आहेत.