शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:14 IST

पालकमंत्री सुभाष देसाई यांचे मत: पर्यटन, कृषी, उद्योगासाठी कालबध्द योजना औरंगाबाद : जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होऊन शून्य मृत्यूदर होईल. ...

पालकमंत्री सुभाष देसाई यांचे मत: पर्यटन, कृषी, उद्योगासाठी कालबध्द योजना

औरंगाबाद : जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होऊन शून्य मृत्यूदर होईल. पर्यटन, कृषी, उद्योग, पाणीपुरवठा आदी विभागांच्या कालबद्ध योजनेतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिला.

पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री देसाई यांच्याहस्ते झाले, यावेळी देसाई बोलत होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले, कोरोना योध्द्यांना पहिल्या टप्प्यातील लसीकरण करणे सुरू झाले. कोरोनाचा शेवट करायचा असल्याने सर्वांना लस मिळेपर्यंत कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. जिल्हयात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होईल. कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल केंद्रामुळे गुन्हेगारीला आळा बसेल. बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी देसाई यांच्याहस्ते विविध पुरस्कार, बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास स्वातंत्र्यसैनिक, खा. इम्तियाज जलील, खा. भागवत कराड, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे, जि. प. अध्यक्षा मीना शेळके, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्र्यांच्यामते जिल्हा आघाडीवर

जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत एकूण ३ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात रेशीम उद्योगात ९ तालुक्यांमध्ये १३०७ शेतकऱ्यांनी तुती लागवड केली असून कोष निर्मिती केंद्रासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवभोजन योजनेचा ७ लाख १ हजार ९७८ लोकांनी लाभ घेतला आहे. ऑरिक सिटी शेंद्रा येथे एका रशियन कंपनीस स्टिल उत्पादनासाठी ४४ एकर जागेचे वाटप केले आहे. या कंपनीत १ हजार कोटींची गुंतवणूक होऊन स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. डीएमआयसी शेंद्रा येथे २०२० मध्ये ६२ एकरचे २० भूखंड वाटप केले आहेत. ७०६ कोटींच्या जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी मिळेल, असा दावा पालकमंत्र्यांनी केला.