शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षकांवर ठपका

By admin | Updated: June 29, 2014 00:36 IST

माजलगाव: कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान ११ महिलांना भूलीचे इंजेक्शन दिले होते;पण ‘रिअ‍ॅक्शन’ झाल्याने नियोजनाच्या अभावाची तहसीलदारांनी गंभीर दखल घेतली़

माजलगाव: कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान ११ महिलांना भूलीचे इंजेक्शन दिले होते;पण ‘रिअ‍ॅक्शन’ झाल्याने शस्त्रक्रि या दुसऱ्यांदा कराव्या लागल्या़ शिबिरातील नियोजनाच्या अभावाची तहसीलदारांनी गंभीर दखल घेतली़ त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, तालुका वैद्यकीय अधीक्षक यांच्यावर ठपका ठेवला असून कारवाईची शिफारस आरोग्य उपसंचालकांकडे केली आहे़येथील ग्रामीण रुग्णालयात १० जून रोजी कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया शिबीर पार पडले़ या शिबीरात २० महिला सहभागी झाल्या़ त्यापैकी ११ महिलांना लोकस झायलेशन हे भुलीचे इंजेक्शन देऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली़ मात्र, शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांना मळमळ होऊ लागले़ त्यानंतर त्यांची पुन्हा तपासणी केली तेंव्हा ‘रिअ‍ॅक्शन’ झाल्याचे उघड झाले़ पहिल्यांदा केलेल्या शस्त्रक्रिया ‘फेल’ गेल्याचेही स्पष्ट झाले़ त्यामुळे या महिलांवर दुसऱ्या दिवशी पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या़या प्रकारानंतर भास्कर शिंदे व डॉ़ भगवान सरवदे यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली़ २७ जून रोजी तहसीलदार डॉ़ अरूण जऱ्हाट यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट दिली़ तेंव्हा रुग्णालयात अस्वच्छता आढळून आली़ त्यांनी शस्त्रक्रिया शिबिराची माहिती घेतली तेव्हा त्यात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आले़ त्यानंतर जऱ्हाट यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ अशोक बोल्डे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्कही केली; पण बोल्डे यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही़ त्यांनी शनिवारी आरोग्य उपसंचालक, जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल पाठविला आहे़अहवालात डॉ़ अशोक बोल्डे व ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ़ सूमंत वाघ यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली आहे़याबाबत तहसीलदार डॉ़ अरुण जऱ्हाट यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी यास दुजोरा दिला़ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़ वाघ म्हणाले, मला यावर प्रतिक्रिया द्यायची नाही़ (वार्ताहर)