शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कचेरीला लावले टाळे

By admin | Updated: June 6, 2017 23:51 IST

परभणी : शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त झुगारुन आंदोलक शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले व आपल्या भावना प्रशासनासमोर मांडल्या़ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी किसान क्रांती समन्वय समितीने जिल्ह्यात सहा दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर मंगळवारी शासकीय कार्यालयांना कुलूप ठोकून शेतकऱ्यांच्या भावना प्रशासन व शासनापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. नियोजनानुसार सकाळी ११.३० च्या सुमारास शेतकरी आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. मुख्य प्रवेशद्वारासमोर बंदोबस्त असल्याने काही वेळ हे आंदोलक याच परिसरात ठाण मांडून बसले. त्यानंतर सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास प्रवेशद्वाराजवळ जाऊन काहींनी लोखंडी गेट ओढून घेत त्या गेटला कुलूप टाकण्याचा प्रयत्न केला. गेटला कुलूप लागलेही परंतु लगेच पोलीस कर्मचाऱ्यांनी हे कुलूप काढून घेतले. या प्रकारानंतर जिल्हाधिकारी पी.शिवा शंकर यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली. शासनाने ४८ तासात कर्जमाफी जाहीर करावी, अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या भावना आपल्या मार्फत शासनाला कळवाव्यात. अन्यथा यापुढे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर यांना आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनावर विलास बाबर, गणेश घाटगे, चंद्रकांत पाथरकर, रामेश्वर आवरगंड, अशोक कांबळे, तुकाराम खिल्लारे, भीमराव मोगले, मुंजाजी तारडे, दिनकर गरुड, शिवाजी कदम, विजय ठेंगे, विष्णू मोगले, अण्णासाहेब गव्हाणे आदींची नावे आहेत़