जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निधीच्या खर्चाचा आढावा

By Admin | Updated: April 1, 2015 00:56 IST2015-04-01T00:45:57+5:302015-04-01T00:56:35+5:30

जालना : सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या कामाचा ३१ मार्च हा शेवटचा दिवस असल्याने जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी मंगळवारी सायंकाळी विविध

District Collector's review of the fund's expenditure | जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निधीच्या खर्चाचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निधीच्या खर्चाचा आढावा


जालना : सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या कामाचा ३१ मार्च हा शेवटचा दिवस असल्याने जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी मंगळवारी सायंकाळी विविध शासकीय कार्यालयांच्या निधीच्या खर्चाचा आढावा जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयात घेतला.
जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खा. रावसाहेब दानवे तसेच जिल्ह्यातील आमदार व लोकप्रतिनिधींनी विकास कामांसाठीचा निधी व्यपगत होऊ नये किंवा शासनास समर्पित करू नये, याबाबत यापूर्वीच जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी नायक यांनी विकास निधीचा योग्य मार्गाने व विहित पद्धतीचा अवलंब करून खर्च करण्यासाठी आग्रह धरला होता.
जिल्हा कोषागार अधिकारी कल्याण औताडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना खर्चाचा व एकूण देयकांची तपशीलवार माहिती दिली. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचीही उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: District Collector's review of the fund's expenditure