सोनोग्राफी सेंटर्सवर जिल्हा प्रशासन ठेवणार नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:14 IST2021-02-05T04:14:19+5:302021-02-05T04:14:19+5:30

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रांवरील रेकॉर्डवर जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे, तीन ...

The district administration will keep an eye on the sonography centers | सोनोग्राफी सेंटर्सवर जिल्हा प्रशासन ठेवणार नजर

सोनोग्राफी सेंटर्सवर जिल्हा प्रशासन ठेवणार नजर

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रांवरील रेकॉर्डवर जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे, तीन ते चार महिने गर्भवती असलेली महिला अचानक सेंटरवर तपासणीस येणे बंद कसे होते. याबाबत लक्ष देण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनाही विश्वासात घेण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कमी असून, हे प्रमाण १ हजार पुरुषांमागे ९२३ आहे. सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करण्याबाबत चर्चा झाली. जिल्ह्याचा निर्देशांक कमी असून, तो राज्याच्या बरोबरीने आणण्याचा संकल्प पालकमंत्री देसाई यांनी केला आहे. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात मुला-मुलींचे हे प्रमाण संतुलित राहिल्यास निर्देशांक वाढण्यास मदत होईल, असे नमूद केले. त्यानुसार जिल्हा प्रशासन नियोजन करीत आहे.

Web Title: The district administration will keep an eye on the sonography centers