पीक विमा आठ दिवसांत वाटप

By Admin | Updated: February 13, 2016 23:56 IST2016-02-13T23:56:21+5:302016-02-13T23:56:21+5:30

जालना : पीक विमा रकमेचे वाटप आठ दिवसांत सुरु करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या व्यवस्थापकांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळास दिले.

Distribution of crop insurance in eight days | पीक विमा आठ दिवसांत वाटप

पीक विमा आठ दिवसांत वाटप


जालना : पीक विमा रकमेचे वाटप आठ दिवसांत सुरु करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या व्यवस्थापकांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळास दिले. जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पीक विम्यासंदर्भात निवेदन सादर केल्यानंतर बँक व्यवस्थापकांनी भूमिका घेतली.
रब्बी हंगामातील पीक विम्याची ७० कोटी रुपयांची रक्कम संबंधित विमा कंपनीने जिल्हा मध्यवर्ती बॅँकेस एक महिन्यापूर्वीच हस्तांतरित केली आहे. परंतु बॅँकेकडून सदरील रकमेचे वाटप होत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. पीक विम्याच्या रकमेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. सदर रक्कम तात्काळ वाटप करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली केली होती. यावेळी माजी आ. संतोष सांबरे, जि. प. उपाध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांच्यासह भगवान कदम, भानुदास घुगे, संतोष मोहिते, विष्णू पाचफुले, बाला परदेशी आदींची उपस्थिती होती.

Web Title: Distribution of crop insurance in eight days