शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

१८५ कोटींचे जिल्ह्यात वाटप

By admin | Updated: April 22, 2016 00:24 IST

परभणी : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी यावर्षी जिल्ह्याला प्राप्त झालेले १८५ कोटी ७५ लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे़

परभणी : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी यावर्षी जिल्ह्याला प्राप्त झालेले १८५ कोटी ७५ लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे़ त्यामुळे आता महसूल प्रशासनाकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी कुठलेही अनुदान शिल्लक राहिले नाही़ पावसाच्या अनियमितपणाचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे़ या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जानेवारी महिन्यात जिल्ह्याला १११ कोटी ६९ लाख रुपये आणि फेब्रुवारी महिन्यात ४३ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता़ मागील वर्षीच्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी शासनाने दुष्काळी अनुदान जाहीर केले आहे़ हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले़ परभणी जिल्ह्याला सुमारे ४०० कोटी रुपयांच्या अनुदानाची आवश्यकता असताना प्रत्यक्षात १८५ कोटी ७५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते़ जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला तहसीलदारांच्या खात्यावर हे अनुदान जमा केले आणि त्यानंतर तहसील प्रशासनाने लाभार्थी शेतकऱ्यांची नावे, खातेक्रमांक आणि प्राप्त अनुदान याची यादी तयार करून त्या त्या बँकांकडे वर्ग केली आहे़ त्यामुळे हे संपूर्ण अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहे़ जिल्हा प्रशासनाकडे आता शेतकऱ्यांसाठी अनुदानाची रक्कम शिल्लक राहिलेली नाही़ जिल्हा प्रशासनाने जरी त्यांची जबाबदारी पूर्ण केली असली तरी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणे बाकी आहे़ शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम बँकांकडे शेतकऱ्यांच्या यादीसह पोहचली आहे़ मात्र बँकांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने ही रक्कम जमा करण्याचे काम बँकांकडून सुरू आहे़ लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे़ (प्रतिनिधी)