शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा़पं़ पदाधिकाऱ्यांच्या अपात्रतेचा अर्ज नामंजूर

By admin | Updated: January 18, 2015 00:30 IST

लातूर : तालुक्यातील पाखरसांगवी येथील सरपंचासह दोन सदस्य व ग्रामसेवकास अपात्र ठरविण्यात यावे यासंदर्भात दाखल झालेला अर्ज अपर जिल्हाधिकाऱ्यांनी नामंजूर केला आहे़

लातूर : तालुक्यातील पाखरसांगवी येथील सरपंचासह दोन सदस्य व ग्रामसेवकास अपात्र ठरविण्यात यावे यासंदर्भात दाखल झालेला अर्ज अपर जिल्हाधिकाऱ्यांनी नामंजूर केला आहे़ त्यामुळे या तीन पदाधिकाऱ्यांचे आणि एका शासकीय कर्मचाऱ्यास पुन्हा कार्यरत राहण्याची मुभा मिळाली आहे़ लातूर तालुक्यातील पाखरसांगवी येथे सरपंच महानंदा बोयणे, ग्रामपंचायत सदस्य अन्वरबी पठाण, संतोष सूर्यवंशी यांच्यासह विद्यमान ग्रामसेवकास मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार अपात्र ठरविण्यात यावे़ यासदंर्भात गावातील सिद्धार्थ ढगे यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता़ या चौघांनी ग्रामसभा तसेच मासिक सभा घेतली नाही़ तसेच एक वर्षाच्या कालावधीत संगणमतांनी लाखे रूपयांचा अपहार केला़ महानंदा बोयणे यांनी स्वत: च्या नावावर गुत्तेदार म्हणून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ४ लाखाचे काम करून पतीच्या नावाने धनादेश उचलले़ तसेच बोयणे यांनी चार महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले नाही, असा आरोप ढगे यांनी आपल्या तक्रार अर्जात केला होता़ या तक्रार अर्जावर अपर जिल्हाधिकारी डॉ़ पुरुषोत्तम पाटोदकर यांच्यासमोर सुनावणी झाली़ यावेळी दोन्ही बाजुने युक्तीवाद करण्यात आला़ यावर डॉ़ पाटोदकर यांनी ढगे यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत असल्याचे आदेश दिले आहेत़ (प्रतिनिधी)