शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

वेगळ्या राज्याच्या मुद्यावरून जनता विकास परिषदेत मतभेद

By admin | Updated: March 29, 2016 00:59 IST

औरंगाबाद : मराठवाडा जनता विकास परिषदेच्या शहर समितीने शनिवारी बैठक घेऊन स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या निर्मितीस परिषदेचा विरोध असल्याचे जाहीर केले.

औरंगाबाद : मराठवाडा जनता विकास परिषदेच्या शहर समितीने शनिवारी बैठक घेऊन स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या निर्मितीस परिषदेचा विरोध असल्याचे जाहीर केले. परंतु ही परिषदेची अधिकृत भूमिका नसल्याचे परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी रविवारी स्पष्ट केले. परिषदेची अधिकृत भूमिका अजून ठरायची आहे आणि त्याबाबतचा निर्णय केंद्रीय कार्यकारिणीच घेईल, असेही ते म्हणाले.स्वतंत्र मराठवाडा राज्यनिर्मितीच्या मागणीच्या विषयावर मंथन करण्यासाठी शनिवारी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या शहर समितीने बैठकीचे आयोजन केले होते. यात बहुसंख्य लोकांनी वेगळे मराठवाडा राज्य झाले पाहिजे, अशी भूमिका मांडली. मात्र, बैठकीच्या शेवटी परिषदेचे पदाधिकारी सारंग टाकळकर यांनी शहर समिती वेगळ्या मराठवाडा राज्यास अनुकूल नसल्याचे निवेदन केले. त्यावरून उपस्थितांनी गोंधळ घातला. त्यावर परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी आज शहर समितीच्या कालच बैठकीतील भूमिका ही परिषदेची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, वेगळे मराठवाडा राज्य निर्माण झाले पाहिजे ही इतर लोकांप्रमाणेच माझीही वैयक्तिक भूमिका आहे. परंतु या विषयावर मराठवाडा जनता विकास परिषदेची अधिकृत भूमिका अजून ठरायची आहे. काल शहर समितीच्या काही जणांनी चर्चेसाठी बैठक घेतली. त्यात त्यांनी वेगळ्या राज्यास विरोध असल्याचे म्हटले. मात्र, ती परिषदेची भूमिका नाही. अगदी शहर समितीचीही नाही. कारण ती बैठक समितीने नव्हे तर समितीच्या चारचौघांनीच बोलाविली होती. परिषदेची भूमिका अजून ठरायची आहे. तो निर्णय केंद्रीय कार्यकारिणीच घेईल, असे अ‍ॅड. प्रदीप देशमुख म्हणाले. एप्रिल, मे महिन्यात परिषदेचे जिल्हास्तरीय अधिवेशन होणार आहे. त्यानंतर जूनमध्ये केंद्रीय कार्यकारिणीची बैठक आणि विभागीय स्तरावरील अधिवेशन होईल. त्यातच याविषयीची अधिकृत भूमिका ठरेल, असेही देशमुख यांनी सांगितले.