शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवेची सीएमआयएची मागणी

By admin | Updated: July 5, 2014 01:01 IST

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी, औद्योगिकनगरी औरंगाबादेत विदेशातून ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे लक्षात घेऊन चिकलठाणा विमानतळावरून थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात यावी

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी, औद्योगिकनगरी औरंगाबादेत विदेशातून ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे लक्षात घेऊन चिकलठाणा विमानतळावरून थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी चेम्बर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआयए)च्या वतीने जेट एअरवेज कंपनीला करण्यात आली आहे. जेट एअरवेज कंपनीचे महाव्यवस्थापक (सेल्स) अ‍ॅनामॉय मित्रा व जलील अहमद यांनी सीएमआयएच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी उद्योजकांच्या संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. यावेळी विमान कंपनीचे अधिकारी व उद्योजकांमध्ये सविस्तर चर्चा झाली. यावेळी संघटनेचे नवीन अध्यक्ष मुनीष शर्मा यांनी सांगितले की, औरंगाबादेतून देशांतर्गत महत्त्वाच्या महानगरात जाण्यासाठी विमानसेवा सुरू करण्यात यावी. विविध देशांत जाण्यासाठी येथून थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात यावी. याशिवाय येथील औद्योगिक उत्पादने, शेतीमालाच्या आयात- निर्यातीसाठी कार्गो सेवा लवकर सुरू करावी. आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करणाऱ्यांसाठी विमानतळावर पॅसेंजर लाऊंज तयार करण्यात यावे. मुंबई- औरंगाबादेतील भाडे कमी करण्यात यावे तसेच औरंगाबादला देशातील महत्त्वाच्या शहरांशी जोडण्यासाठी दिल्ली- हैदराबाद, अहमदाबाद- औरंगाबाद, अशी विमानसेवाही सुरू करण्यात यावी. औरंगाबादकरांच्या या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन अ‍ॅनामॉय मित्रा यांनी यावेळी दिले. सीएमआयएच्या वतीने उपाध्यक्ष आशिष गर्दे, माजी अध्यक्ष मिलिंद कंक, कॅप्टन पीयूष सिन्हा आदी उद्योजकांची यावेळी उपस्थिती होती.सीएमआयएची कार्यकारिणी जाहीरचेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआयए) या संघटनेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी मुनीष शर्मा तर सचिवपदी रितेश मिश्रा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मराठवाड्यातील उद्योजकांचे नेतृत्व करणारी ही सर्वात मोठी संघटना आहे. या संघटनेची वर्ष २०१४-१५ साठीची कार्यकारिणी निवडण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष- आशिष गर्दे, कोषाध्यक्ष- आशिक पोकर्णा, सहसचिव- दुष्यंत पाटील, सहकोषाध्यक्ष- अक्षय राठी यांचा समावेश आहे. याशिवाय एम. पी. शर्मा, नवीन निजहवन, विनय चितळे, जतीन सुभेदार, व्ही. एन. नांदापूरकर, आणि डॉ.अनंत पंढरे हे सदस्य आहेत.