शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

घृष्णेश्वर मंदिरात थेट गाभारा दर्शन बंद; वाढत्या गर्दीमुळे भाविकांना आता उंबरठ्यावरूनच दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 18:35 IST

कोरोना काळात काही महिने अशा पद्धतीने दर्शन दिले जात होते, पण आता ही पद्धत कायमस्वरूपी राहणार की केवळ गर्दीपुरती मर्यादित आहे, याबाबत संभ्रम आहे.

- सुनील घोडके
खुलताबाद (छत्रपती संभाजीनगर):
बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेली थेट दर्शन पद्धत आज (शनिवार, दि. २७) दुपारपासून अचानक बंद करण्यात आली आहे. नाताळच्या सुट्ट्यांमुळे झालेली तुफान गर्दी आणि लांबच लांब लागलेल्या रांगांमुळे मंदिर प्रशासनाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून भाविकांना गर्भगृहात प्रवेश नाकारला असून प्रवेशद्वारावरच दर्शन व्यवस्था केली आहे.

श्री घृष्णेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे येणाऱ्या प्रत्येक सामान्य भाविकाला थेट ज्योतिर्लिंगावर डोके टेकवून किंवा स्पर्श करून अभिषेक करण्याची मुभा होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून वेरूळ लेणी आणि मंदिर परिसरात पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढला आहे. आज सकाळी दर्शनासाठी ४-४ तास लागत होते. ही गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून प्रशासनाने दुपारी १२ वाजता गर्भगृहाचे दरवाजे बंद केले आणि सभामंडपाच्या उंबरठ्यावरच शिवलिंगाची मूर्ती ठेवून 'बाह्य दर्शन' सुरू केले.

भाविकांमध्ये नाराजीचे सूर
अनेकांनी श्रद्धेपोटी दूरवरून थेट दर्शनाची आस धरून प्रवास केला होता, मात्र उंबरठ्यावरून दर्शन घ्यावे लागल्याने भाविक भावूक झाले होते. कोरोना काळात काही महिने अशा पद्धतीने दर्शन दिले जात होते, पण आता ही पद्धत कायमस्वरूपी राहणार की केवळ गर्दीपुरती मर्यादित आहे, याबाबत संभ्रम आहे. मंदिर देवस्थानचे अध्यक्ष कुणाल दांडगे आणि विश्वस्त राजेंद्र कौशीके यांनी या विषयावर सध्या तरी भाष्य करण्याचे टाळले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ghrushneshwar Temple halts direct sanctum access due to crowd surge.

Web Summary : Due to massive crowds, Ghrushneshwar Temple, a Jyotirlinga site, has stopped direct sanctum access. Devotees now view the deity from the threshold. The decision, prompted by safety concerns during the holiday season, has caused mixed reactions among visitors.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर