शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर

By admin | Updated: August 1, 2014 00:28 IST

उस्मानाबाद : घटनेनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळणे गरजेचे असतानाही केवळ हिंदीतील धनगड या शब्दामुळे राज्यातील धनगर समाजबांधवांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही़

उस्मानाबाद : घटनेनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळणे गरजेचे असतानाही केवळ हिंदीतील धनगड या शब्दामुळे राज्यातील धनगर समाजबांधवांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही़ त्यामुळे धनगर समाजाचा एस़टी़प्रवर्गात समावेश करून आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यात गुरूवारी ठिकठिकाणी रास्तारोको, मोर्चा, धरणे आंदोलन करण्यात आले़ काक्रंबानजीक बसवर दगडफेक करण्यात आली़ धनगर समाजाच्या आंदोलनाने जिल्हा दणाणला होता़लोहारा तालुक्यातील आष्टामोड येथे शेळ्या, मेंढरे घेऊन रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील बसथांब्यानजीक रास्तारोको दरम्यान बसवर दगडफेक करण्यात आली़़ वर दगडफेक करण्यात आली़ या आंदोलनात भाजपा महिला आघाडीच्या महानंदा पैलवान, शाम ढेरे, राजाभाऊ शेंडगे, उमेश खांडेकर, शहाजी देवगुंडे, उपसरपंच उमेश पाटील, आनंद मदणे, अमृत झाडे, कल्पना शिरगिरे, विठ्ठल देवगुंडे, पुतळाबाई मदणे, विष्णू शिरगिरे, व्यंकट झाडे, नागनाथ कोरे, शिवाजी कोरेकर, सुनील पाटील, अ‍ॅड़नागनाथ कानडे, बाबूराव मदणे, अशोक देवगुंडे यांच्यासह काक्रंबा, काक्रंबावाडी, तडवळा, मोर्डा, तुळजापूर, कार्ला आदी परिसरातील समाजबांधव सहभागी झाले होते़उस्मानाबादेत धरणेयेथे धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी गोविंद कोकाटे, अ‍ॅडख़ंडेराव चौरे, दत्ता बंडगर, राजाभाऊ वैद्य, आश्रूबा कोळेकर, सुनील काकडे, संदीप वाघमोडे, राजाराम तेरकर, इंद्रजित देवकते, कमलाकर दाणे, अनिल ठोंबरे, अमोल कसपटे, शिवाजी गावडे, पिंटू गायके, दत्ता गायके, केशव सलगर, अमोल पाडुळे आदी समाजबांधव सहभागी झाले होते़ग्रामपंचायतीवर मोर्चाउमरगा : तालुक्यातील गुंजोटी ग्रामपंचायतीवर धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर सरपंच सहदेव गावयकवाड व ग्रामविकास अधिकारी बिराजदार यांना निवेदन देण्यात आले. मोर्चामध्ये दशरथ देवकते, खंडू दूधभाते, शिवकरण सूर्यवंशी, मनोज दुधभाते, दयानंद काटे, सरस्वती काळे, बंडाबाई बनसोडे, दीपक काळे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.तासभर रास्ता रोकोउस्मानाबाद : धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी दुपारी २ वाजता तालुक्यातील आष्टामोड येथे राष्ट्रीय महामार्गावर जवळपास तासभर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आर. डी. शेंडगे, उमाकांत लांडगे, अ‍ॅड. सत्यवान आडसुळे, धनंजय सातपुते, अशोक बनसोडे, प्रकाश घोडगे, हरिश डावरे, प्रदीप मदने, दिलीप भालेराव आदींची उपस्थिती होती. आंदोलकांवर गुन्हातुळजापूर- लातूर मार्गावरील काक्रंबा बसस्थांब्याजवळील आंदोलनादरम्यान बसवर (क्ऱएम़एच़२०- बी़एल़२०९२) दगडफेक करण्यात आली़ यात बसचे ४० हजार रूपयांचे नुकसान झाले़ या याबाबत सपोनि शाम बुवा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धोंडीराम झाडे, नागनाथ खताळ, शाम ठेरे, शहाजी देवगुंडे, सचिन ढेरे, व्यंकट झाडे, उमेश पाटील, विठ्ठल देवगुंडे, उमेश खांडेकर, अंगद मदने (सर्व रा़ काक्रंबा), राजेंद्र शेंडगे, अ‍ॅड़ कानडे, महानंदा पैलवान, शिवाजी कोळेकर (सर्व राक़ाक्रंबावाडी), अंगद सलगर (मंगरूळ), दत्ता बंडगर (उस्मानाबाद) आदी १६ जणांसह १००० ते १२०० जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ बेंबळीत मेंढर मोर्चातालुक्यातील बेंबळी येथे धनगर विकास परिषदेच्या वतीने ग्रामपंचायतीवर मेंढरांचा मोर्चा काढण्यात आला़ यावेळी शिवाजी गावडे, डॉग़ोविंद कोकाटे, बिरू वाघुलकर, दत्ता सुडके, तानाजी फस्के, गोरोबा लोकरे, बालाजी गावडे, बालाजी दाणे, अमोल गाडे, मारूती कस्पटे, राजाभाऊ सोनटक्के, अर्जुन सोनटक्के आदी समाजबांधव सहभागी झाले होते़