घर साफ करून ‘बंटी-बबली’ची धूम

By Admin | Updated: February 3, 2015 00:59 IST2015-02-03T00:22:59+5:302015-02-03T00:59:36+5:30

बर्दापूर : अंबाजोगाई तालुक्यातील सोमनवाडी येथून एका विवाहित तरुणाने तरुणीसह रविवारी पलायन केले. पळून जाताना तरुणीने प्रियकरासह स्वत:चेच घर साफ केले. त्या दोघांचाही आता पोलिस शोध घेत आहेत.

Dhan of 'Bunty-Babli' cleaned the house | घर साफ करून ‘बंटी-बबली’ची धूम

घर साफ करून ‘बंटी-बबली’ची धूम

बर्दापूर : अंबाजोगाई तालुक्यातील सोमनवाडी येथून एका विवाहित तरुणाने तरुणीसह रविवारी पलायन केले. पळून जाताना तरुणीने प्रियकरासह स्वत:चेच घर साफ केले. त्या दोघांचाही आता पोलिस शोध घेत आहेत.
सौदागर जगन्नाथ सोनवणे (रा. सोमनवाडी ) असे आरोपीचे नाव आहे. तो विवाहित असून त्याला एक वर्षाचा मुलगा आहे. गावातीलच एका तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध होते. सदरील तरुणी बारावीच्या वर्गात शिक्षण घेते. दरम्यान, रविवारी त्या दोघांनीही पलायन केले. जाताना प्रियकराच्या मदतीने तरुणीने स्वत:च्याच घरातील दागिने व रोख रक्कम असा अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. तरुणीच्या वडिलांनी सोमवारी बर्दापूर ठाणे गाठून सौदागरविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरुन अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे.
तपास सुरु
सहायक निरीक्षक बी. डी. बोरसे म्हणाले, त्या दोघांचाही शोध घेण्याचे काम सुरु असून त्यांना पकडण्यात येईल. (प्रतिनिधी)

Web Title: Dhan of 'Bunty-Babli' cleaned the house