शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘डेप्युटी सीईओं’च्या दालनास लावले टाळे

By admin | Updated: June 17, 2014 01:11 IST

बीड : येथील जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनास अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांनी सोमवारी टाळे ठोकले.

बीड : येथील जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनास अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांनी सोमवारी टाळे ठोकले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. जिल्हा परिषदचे उपमख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) आर. आर. भारती यांच्याकडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचाही प्रभाारी कार्यभार आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे हे रजेवर गेल्याने भारतींंकडे अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. दरम्यान, जि.प. अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला हे सोमवारी दुपारी चार वाजता सामान्य प्रशासन विभागात पोहोचले. तेंव्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी भारती हे आपल्या दालनात नव्हते. त्यामुळे अध्यक्ष अब्दुल्ला यांनी त्यांच्या दालनास टाळे ठोकले. त्यामुळे कर्मचारीही धास्तावले. हो, मीच लावले टाळे!जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, मी सामान्य प्रशासन विभागात तीन चकरा मारल्या. मात्र, भारती हजर नव्हते. त्यामुळे मीच कुलूप लावले. इतर सर्व अधिकारी उपस्थित होते असा दावाही त्यांनी केला. दांड्याबहाद्दर अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय नाही असा इशारा त्यांनी दिला.भारती म्हणाले, बैठकीत होतो!उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. भारती यांनी सांगितले की, कोणालाही विचारा मी दिवसभर बैठकीतच होतो. सीईओंच्या केबिनमध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची बैठक मी घेतली. माझ्या दालनात बसून मी अनेक संचिका हातावेगळ्या केल्या. मी दालनात नेहमी हजर असतो. आरोप चुकीचे आहेत.कुलूप कशामुळे?झेडपीआरच्या २०१४- १५ या वर्षातील पाऊणे तीन कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. मात्र, प्रस्तावित केलेली कामे नियमबाह्य आहेत. या कामांसाठी अद्याप निधीही उपलब्ध नाही. या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यासाठी आर. आर. भारतींवर दबाव आहे; परंतु भारतींनी स्वाक्षरीस नकार दिला. त्यामुळे त्यांच्या केबिनला टाळे ठोकल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)सत्ताधाऱ्यांची मनमानीभाजपाचे गटनेते मदनराव चव्हाण म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी जिल्हा परिषदेत मनमानी चालवली आहे. अध्यक्ष अब्दुल्लांनी भारतींनाच का टार्गेट केले? हे समोर आले पाहिजे. सीईओ राजीव जवळेकर व इतर काही अधिकारी नेहमीच गायब असतात. ते अध्यक्षांना दिसत नाही का? असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.