शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

शहरात डेंग्यूचा फैलाव!

By admin | Updated: September 20, 2015 01:11 IST

औरंगाबाद : शहरात डेंग्यू आजाराने डोके वर काढले असून, १ ते १० सप्टेंबरपर्यंत तब्बल १२ संशयित रुग्ण सापडले आहेत.

औरंगाबाद : शहरात डेंग्यू आजाराने डोके वर काढले असून, १ ते १० सप्टेंबरपर्यंत तब्बल १२ संशयित रुग्ण सापडले आहेत.महापालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्यूचा मुकाबला करण्यासाठी कंबर कसली असून, शहरात सर्वत्र धूर फवारणी, औषध फवारणी, अ‍ॅबेट ट्रिटमेंट आदी व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. सोमवारी सकाळी मनपा आयुक्त प्रकाश महाजन स्वत: आरोग्य विभागाची बैठक घेणार आहेत.शहराच्या वेगवेगळ्या भागात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून येत आहेत. दिल्लीत डेंग्यूमुळे १६ पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वेळीच उपाययोजना केल्यास डेंग्यू अधिक फैलावणार नाही, म्हणून काम सुरू केल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर यांनी दिली. मोटारसायकल अपघातात एक ठारऔरंगाबाद : दोन मोटारसायकलींमध्ये समोरासमोर टक्कर झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात झाल्टा फाट्याजवळ शनिवारी सायंकाळी घडला. पोलिसांनी सांगितले की, सांखेडा येथील रहिवासी दीपक गवळी (३०) हा तरुण आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोटारसायकलने बीडकडून औरंगाबादकडे येत होता. झाल्टा फाट्याजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीसोबत त्याची टक्कर झाली. या घटनेत तो गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडला. त्यास शासकीय रुग्णवाहिनीतून घाटीत दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. चिकलठाणा पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या रोडवर सतत अपघात होत असून वाहने सावकाश चालवावी, असे आवाहन पोलिसांनी केले.