शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढले

By admin | Updated: May 26, 2014 01:15 IST

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. या आजारात रुग्णाच्या शरीरातील पांढर्‍या पेशींची संख्या अचानक कमी होते.

 औरंगाबाद : औरंगाबाद शहरात डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. या आजारात रुग्णाच्या शरीरातील पांढर्‍या पेशींची संख्या अचानक कमी होते. अशा वेळी रुग्णास तातडीने रक्तघटक असलेल्या पांढर्‍या पेशी द्याव्या लागतात. त्यामुळे येथील विविध रक्तपेढ्यांकडे पांढर्‍या पेशींची मागणी वाढली आहे. डास चावल्यामुळे डेंग्यू, मलेरिया असे साथरोग होतात. उन्हाळा व पाणीटंचाईमुळे बहुतेक जण पाणी साठवून ठेवत आहेत. त्यामुळे घराघरांत रांजण, माठ आणि लहान-मोठी भांडी पाण्याने भरलेली दिसतात. वापरासाठी साठविलेले पाणी, कूलरमधील पाण्यात डास अंडी घालतात. त्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे त्यांचे डास बनतात. याविषयी डॉ. विशाल ढाकरे यांनी सांगितले की, एडिस इजिप्ती डास चावल्यानंतर डेंग्यू होतो. डेंग्यू आजारात रुग्णास ताप येतो. या तापेकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाच्या रक्तातील पांढर्‍या पेशींची संख्या अचानक घटते. पांढर्‍या पेशी ५० हजार ते २० हजारांपर्यंत कमी होताच रुग्णाच्या शरीरात रक्तस्राव होण्याचा धोका असतो. त्याला अशक्तपणा येतो आणि दम लागतो. रक्ततपासणी केल्यानंतरच या आजाराचे निदान होते. रुग्ण जेव्हा डॉक्टरांकडे जातो, तेव्हा त्याच्या प्रकृतीनुसार त्यास अ‍ॅडमिट केले जाते. बर्‍याचदा रुग्णास आयसीयूमध्ये भरती करावे लागते. त्याला रक्त ाच्या पेशी द्याव्या लागतात, असे ढाकरे म्हणाले. डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी डासांची पैदास रोखणे आवश्यक आहे. पावसाळ्यात पाण्याचे डबके साचून तेथे डासांची पैदास होते. त्यामुळे पावसाळ्यात घराशेजारी पाण्याचे डबके साचू देऊ नका, असा सल्ला डॉ. ढाकरे यांनी दिला. शहरातील विविध खाजगी रुग्णालयांत डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने उपचार घेत आहेत. या रुग्णांच्या शरीरातील पांढर्‍या पेशी कमी झाल्या असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पांढर्‍या पेशी आणण्यास सांगितले जाते. त्यामुळे रक्तपेढीत आता पांढर्‍या पेशींच्या बॅगची मागणी वाढली आहे.