१ फेब्रुवारी रोजी लोकशाही दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:14 IST2021-02-05T04:14:21+5:302021-02-05T04:14:21+5:30
औरंगाबाद : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येतो. फेब्रुवारी महिन्याचा लोकशाही दिन १ फेब्रुवारी रोजी ...

१ फेब्रुवारी रोजी लोकशाही दिन
औरंगाबाद : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येतो. फेब्रुवारी महिन्याचा लोकशाही दिन १ फेब्रुवारी रोजी दु. १ वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविले आहे.
ग्रामीण भागातील लसीकरण पूर्ण करा
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील सर्वांना लसीकरण करण्यात येत असून ग्रामीण भागातील लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी यंत्रणेला केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोना लसीकरण आढावा बैठक गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके आदींसह तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांची उपस्थिती होती.
स्वीकृतीपत्र स्वीकारण्यास मुदतवाढ
औरंगाबाद : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या २०२१ च्या हार्ड कॉपी (आवेदनपत्र) विषयनिहाय परीक्षक, नियामकाचे स्वीकृतीपत्र स्वीकारण्यासाठी २८ जानेवारी मुदत होती. आता १६ फेब्रुवारी रोजी शुल्क भरण्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या, परीक्षक, नियामक स्वीकृतीपत्रे स्वीकारण्यात येतील, असे विभागीय मंडळाचे सचिव यांनी कळविले आहे.