गॅस शवदाहिनी, मोबाइल टेस्टिंग लॅबसाठी १२ कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:05 IST2021-07-29T04:05:46+5:302021-07-29T04:05:46+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत स्मशानभूमीत वेटिंग असल्याचे विदारक चित्र होते. अंत्यसंस्कारासाठी लाकडे मिळणेही कठीण झाले होते. त्यामुळे गॅसवर चालणाऱ्या शवदाहिन्या ...

Demand for Rs 12 crore for gas crematorium, mobile testing lab | गॅस शवदाहिनी, मोबाइल टेस्टिंग लॅबसाठी १२ कोटींची मागणी

गॅस शवदाहिनी, मोबाइल टेस्टिंग लॅबसाठी १२ कोटींची मागणी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत स्मशानभूमीत वेटिंग असल्याचे विदारक चित्र होते. अंत्यसंस्कारासाठी लाकडे मिळणेही कठीण झाले होते. त्यामुळे गॅसवर चालणाऱ्या शवदाहिन्या सुरू करण्याचा निर्णय मनपा प्रशासकांनी घेतला. कैलासनगर येथे गॅस दाहिनी सुरू करण्यासाठी औरंगाबाद फर्स्ट या संघटनेने पुढाकार घेतला. येथील काम पूर्ण झाले आहे. त्यासोबतच क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या सहकार्याने गॅस दाहिनी सुरू केली जाणार आहे. महापालिकेने सिडको एन-६, पुष्पनगरी व सिडको एन-११ येथील स्मशानभूमीत गॅसदाहिनी सुरू करण्याचा निर्णय घेत त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला होता. आता शहरातील सात ठिकाणी स्मशानभूमीमध्ये गॅस दाहिनी सुरू करण्यासाठी व मोबाइल टेस्टिंग लॅब खरेदी करण्यासाठी राज्य आपत्ती मदत निधीअंतर्गत १२ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मिळावा, असा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाला पाठविला आहे.

----------

या स्मशानभूमींचा समावेश

पुष्पनगरी, सिडको एन-११, मुकुंदवाडी, बेगमपुरा, भावसिंगपुरा, कैलासनगर (अतिरिक्त), सातारा परिसर. एका गॅस दाहिनीसाठी एक कोटी ४५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच मोबाइल टेस्टिंग लॅब व्हॅन खरेदीसाठी दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Web Title: Demand for Rs 12 crore for gas crematorium, mobile testing lab