शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

१५ कोटींची मागणी

By admin | Updated: June 10, 2016 23:45 IST

परभणी : जिल्ह्यातील टंचाई निवारणाची कामे करण्यासाठी १५ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांची आवश्यकता असून जिल्हा प्रशासनाने या निधीची मागणी वरिष्ठांकडे नोंदविली आहे.

परभणी : जिल्ह्यातील टंचाई निवारणाची कामे करण्यासाठी १५ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांची आवश्यकता असून जिल्हा प्रशासनाने या निधीची मागणी वरिष्ठांकडे नोंदविली आहे. मात्र अद्याप हा निधी प्राप्त झाला नसल्याने टंचाई निवारणाची कामे संथगतीने सुरु आहेत. मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र झाली होती. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापासूनच टंचाईचे नियोजन प्रशासनाला करावे लागले होते. सप्टेंबर ते जून या कालावधीसाठी जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखडा तयार केला होता. सुमारे ४४ कोटी ८९ लाख ४७ हजार रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार कामांनाही प्रारंभ झाला. अनेक कामे सुरु झाली असली तरी निधीची कमतरता प्रशासनाला भासत आहे. जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ विविध कामे सुरु आहेत. त्यात विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिरी घेणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक योजना यासह टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, विहीर अधिग्रहण करुन परिसरातील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबविणे अशी कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यात सुमारे २०० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून पाचशेहून अधिक विहीर आणि बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. उपलब्ध निधीतून टँकर आणि अधिग्रहणाची कामे होत असली तरी इतर कामांसाठी अद्याप प्रशासनाला निधी उपलब्ध झाला नाही. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासनाने मे अखेर १५ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे नोंदविली आहे. हा निधी उपलब्ध झाल्यानंतर त्यातून नळ योजना विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक पाणीपुरवठा योजना यासह इतर कामांसाठी निधी वापरता येणार आहे. जिल्ह्यातील नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी ६ कोटी २४ लाख ८२ हजार रुपये, तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा योजनेसाठी ८९ लाख २० हजार रुपये, नवीन विंधन विहिरी घेण्यासाठी ६१ लाख ९ हजार रुपये, विंधन विहिरीच्या विशेष दुरुस्तीसाठी ३६ लाख ७९ हजार रुपये, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ४ कोटी २९ लाख ४० हजार रुपये आणि खाजगी विहीर अधिग्रहणासाठी २ कोटी ९२ लाख १ हजार रुपये अशा १५ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांच्या निधीची प्रशासनाला आवश्यकता आहे. मे अखेर या निधीची मागणी नोंदविली असली तरी अद्याप जिल्ह्याला निधी प्राप्त झालेला नाही. सध्या प्रशासनाने ही कामे प्रस्तावित केली आहेत. कामांची प्रक्रिया सुरु झाली असून निधी उपलब्ध झाल्यास या कामांना गती मिळणार आहे. (प्रतिनिधी)