राम मंदिर प्रतिष्ठापनाच्या पुर्वसंध्येला दीपोत्सव व फटाक्यांची आतषबाजी

By बापू सोळुंके | Published: January 21, 2024 10:07 PM2024-01-21T22:07:35+5:302024-01-21T22:08:58+5:30

अखेर तो दिवस आला, अयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टींनी हा दिवस दिवाळी सारखा साजरा करण्याचा आवाहन केलं होतं.

Deepotsav and firework display on the eve of Ram temple pran pratisha sohla | राम मंदिर प्रतिष्ठापनाच्या पुर्वसंध्येला दीपोत्सव व फटाक्यांची आतषबाजी

राम मंदिर प्रतिष्ठापनाच्या पुर्वसंध्येला दीपोत्सव व फटाक्यांची आतषबाजी

छत्रपती संभाजीनगर: उद्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक दिवसाच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने हजारोंच्या साक्षीने दीपोत्सव आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्याचबरोबर कार सेवक पती-पत्नी या दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.   

अयोध्येत प्रभू राम यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला. या ऐतिहासिक दिवसाची तमाम हिंदू बांधव अनेक दिवसांपासून वाट बघत होते. अखेर तो दिवस आला, अयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टींनी हा दिवस दिवाळी सारखा साजरा करण्याचा आवाहन केलं होतं. या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे   देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने दीपोत्सव व फटाक्यांची आतषबाजीच आयोजन करण्यात आलं होतं. अयोध्या येथे गेलेल्या कारसेवक राजु जहागिरदार व त्यांची पत्नीचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवगिरी प्रतिष्ठानचे विनोद पाटील, अभिषेक देशमुख, सुमित खांबेकर, सोमनाथ बोंबले,विनोद बनकर,अशोक मोरे , राजगौरव वानखेडे,अनिकेत निल्लावार यांच्यासह समस्त हिंदू बांधव उपस्थित होते.

Web Title: Deepotsav and firework display on the eve of Ram temple pran pratisha sohla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.