शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा लेणी रस्त्यासाठी नोव्हेंबरअखेरची डेडलाइन; गडकरींचे जुने ट्वीट व्हायरल झाल्याने पुन्हा चर्चा

By विकास राऊत | Updated: November 1, 2025 18:45 IST

विदेशी पर्यटक सोशल मीडियातून या रस्त्याबाबत खेद व्यक्त करतात.

छत्रपती संभाजीनगर : येथून जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर बदनाम होत असल्यामुळे ३० नोव्हेंबरपर्यंत पाच ठिकाणी रखडलेले काम पूर्ण होईल, असा दावा सा. बां. विभागाने केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याबाबत केलेले जुने ट्वीट व्हायरल झाल्याने पुन्हा चर्चा सोशल मीडियातून चर्चा सुरू झाली.

विदेशी पर्यटक सोशल मीडियातून या रस्त्याबाबत खेद व्यक्त करतात. शहरातील सिडकोतील वसंतराव नाईक चौक ते अजिंठा लेण्यांपर्यंतच्या सुमारे ९५ किमी अंतराच्या रस्त्यापैकी सुमारे २० किमीमधील कामही अर्धवट आहे.

२०१५ ते २०२० या पाच वर्षांत या रस्त्याची दोनदा डागडुजी केली. २०२० पासून १ हजार कोटींतून सिमेंट काँक्रीटीकरणातून रस्त्याचे काम सुरू केले. २०२५ साल संपत आले असून, अजूनही रस्त्याचे काम सुरूच आहे. ६३ कोटींतील सिल्लोड शहरातील ६.२ किमी निल्लोड, ७ किमी हर्सूल, १ किमी पालोद, अजिंठा पुलाचे काम बाकी आहे. यातील निल्लोड ते सिल्लोडपर्यंतचे काम ७ किमीचे धुळे सा.बां.कडे आहे.

शहरातून जाणाऱ्या रस्त्यांचे काय?अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या हर्सूल ते फर्दापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफच्या चौपदरीकरणादरम्यान असलेल्या हर्सूल गावातील मालमत्तांची पाडापाडी करून रस्ता मोकळा केला. परंतु रस्त्यालगत असलेल्या कब्रस्तानाच्या स्थलांतराचा प्रश्न कायम आहे. रस्त्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडे जागा मागितली होती. परंतु त्यांनी जागा दिली नाही. मग कब्रस्तानच्या जागेचा पर्याय समोर आला. जागा मिळेपर्यंत सध्या १० मीटर रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. तर वसंतराव नाईक चौक ते हर्सूलपर्यंतचे कामही संथपणे सुरू आहे.

पाच वर्षांत ७० किमी कामरोज ३ किमी काँक्रीट रस्ते बांधण्याचा दावा करणारी यंत्रणा ५ वर्षांपासून ९५ किमी पैकी ७० किमी रस्ता बांधू शकली आहे. कंत्राटदाराची क्षमता १२० टीपीएच, ३० हजार क्युबिक मीटर दरमहा काँक्रीटीकरणाची असतानाही कामाला विलंब झाला. या क्षमतेच्या कंत्राटदाराकडून दरमहा १३ किमी रस्ता बांधणी अपेक्षित असते. लांबी, रुंदी, जागा, वाहतूक याचा विचार होऊन रस्त्याचे काम होते. या क्षमतेचा विचार केला, तर साधारणत: तीन महिन्यांत रस्ता व आठ महिन्यांत पुलांचे काम होणे शक्य आहे. वर्षभरात रस्ता पूर्ण होण्याऐवजी पाच वर्षे लागली.

नोव्हेंबरअखेरपर्यंत काम होईलनोव्हेंबरअखेरपर्यंत शिल्लक राहिलेले काम पूर्ण करू. त्यासाठी कामाचे टप्पे ठरविले आहेत. निल्लोड ते सिल्लोडपर्यंतचे ७ किमीचे काम धुळे सा.बां.कडे आहे. सिल्लोड शहरातील ६.२ किमी, निल्लोड ते भवन फाट्यापर्यंतचे काम, १ किमी पालोदपर्यंतचे काम नोव्हेंबरअखेरपर्यंत संपेल. अजिंठा पुलाचे काम पावसाळ्यामुळे बाकी आहे.- एस. एल. गलांडे, कार्यकारी अभियंता, सा. बां.

पर्यटन कसे वाढेल?अनेक वर्षांनंतरही, २,३०० वर्षे जुने युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेण्यांकडे जाणारा रस्ता अजूनही अर्धवट अवस्थेत आहे. जर हा रस्ता दुर्लक्षित राहिला तर पर्यटन कसे वाढेल?-सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, ‘एटीडीएफ’

English
हिंदी सारांश
Web Title : Ajanta Caves Road: November Deadline, Gadkari's Old Tweet Revives Discussion

Web Summary : The dilapidated Ajanta Caves road, a global embarrassment, faces a November deadline for completion. Despite ongoing work since 2020 and significant investment, progress is slow, drawing criticism and renewed attention due to a resurfaced tweet by Union Minister Gadkari.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरroad safetyरस्ते सुरक्षा