शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

डीसीसीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये निरूत्साह

By admin | Updated: April 11, 2015 00:21 IST

शिरीष शिंदे , बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जोरदार तयारीला लागले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँगेसचे नेते सदरील निवडणुकीसाठी

शिरीष शिंदे , बीडजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जोरदार तयारीला लागले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँगेसचे नेते सदरील निवडणुकीसाठी निरूत्साही असल्याचे पहावयास मिळत आहेत. राकाँने निवडणुकीसाठी पॅनल तयार करण्यासाठी बैठकही बोलावली नाही अन् तशी चर्चाही केली नाही. माजी राज्यमंत्री सुरेश धस यांची पत्नी संगीता यांनी आष्टी तालुका मतदार संघातून, बँकेचे माजी संचालक दिनकर कदम यांनी बीड मतदार संघातून, केजमधून बजरंग सोनवणे, अंबाजोगाईमधून चव्हाण यांनी तर परळीमधून नरहरराव निर्मळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हे सर्व उमेदवार राष्ट्रवादीचे असले तरी पॅनलबाबत निर्णय झालेला नाही. आपआपल्यापद्धतीने जो-तो उमेदवार निवडणूक लढवीत आहे. पॅनल नसल्याचा फायदा भाजपाच्या कार्यकर्त्यांना होणार हे निश्चित मानले जात आहे. नोंदणी रद्द झालेल्या संस्थांच्या विरोधात होणार सुनावणीडीसीसीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून राजकीय दबाव आणून अनेक बोगस संस्था व त्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश मतदार यादीत करण्यात आला आहे. त्यावर माजी संचालक जालिंदर पिसाळ व कृष्णकुमार केरुळकर यांनी आक्षेप घेत औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. नोंदणी रद्द झालेल्या आणि अवसायनात निघालेल्या अनेक बोगस संस्थांचा समावेश बँकेच्या मतदार यादीत केला आहे. सदरील याचिकेवर १५ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. दैनिकामध्ये जाहीरात देऊन प्रतिवादींना बाजू मांडण्यासाठी हजर राण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल लागला तर ९८ उमेदवार कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा लाभ राकाँच्या कार्यकर्त्यांना होणार यात शंका नाही. बोगस संस्था स्थापन करुन त्यांच्या नावावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज उचलण्यासाठी बोगस मतदार यादीत समाविष्ठ केले आहेत. पुन्हा बनावट संस्था व मतदारांचा यादीत समावेश करण्यात आला असल्याने पुन्हा खळबळ उडली आहे. अनेकांना यादीत नावे असल्याचे माहीत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. आता न्यायालयाच्या आदेशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली व शुक्रवारी पात्र व अपात्र असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सहा उमेदवारांचे नऊ अर्ज बाद करण्यात आले आहेत तर काहींनी एका पेक्षा अधिक अर्ज दाखल केल्याने ते निकाली काढण्यात आले आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंंगणात १६२ उमेदवार आहेत. २४ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख असल्याने त्यावर सर्वांच्या नजरा टिकल्या आहेत. त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. डीसीसीच्या निवडणुकीसाठी १४२३ मतदार मतदान करणार आहेत.