दसरा महोत्सवाचे बासापूजन आज

By Admin | Updated: September 8, 2014 00:04 IST2014-09-07T23:50:17+5:302014-09-08T00:04:02+5:30

हिंगोली : येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे बासापूजन ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता रामलीला मैदानावर होणार आहे.

Dashera Festival Basapu Pujan Today | दसरा महोत्सवाचे बासापूजन आज

दसरा महोत्सवाचे बासापूजन आज

हिंगोली : येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे बासापूजन ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता रामलीला मैदानावर होणार आहे.
यंदा हे पूजन गोपाललाल मंदिराऐवजी रामलीला मैदानावरच करावे व पूजेसाठी खाकीबाबा मठाच्या महंतांना पाचारण करावे, बासा पूजन ८ रोजी सकाळी ८ वाजता घेण्याचे ठरले. त्यासाठी खा.राजीव सातव, आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, जिल्हाधिकारी तुकाराम कासार, पोलिस अधीक्षक एन.अंबिका, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे यांच्यासह दसरा महोत्सव समितीच्या पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
आज जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी दसरा मैदानावर पाहणी करून विविध सूचना दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, विलास गोरे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Dashera Festival Basapu Pujan Today