शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत मित्राचा काढला काटा

By admin | Updated: June 5, 2014 00:50 IST

गोलापांगरी : सोबत दारू पिल्यानंतर मित्राच्या खिशातील ३ ते ४ हजार रूपये हिसकावून घेण्यासाठी केलेल्या बेदम मारहाणीत श्यामराव लक्ष्मण चौगुले यांचा मृत्यू झाला.

गोलापांगरी : सोबत दारू पिल्यानंतर मित्राच्या खिशातील ३ ते ४ हजार रूपये हिसकावून घेण्यासाठी केलेल्या बेदम मारहाणीत श्यामराव लक्ष्मण चौगुले यांचा मृत्यू झाला. मात्र घटनेतील आरोपींचा शोध देशी दारूच्या दुकानातील सी.सी.टी.व्ही. फुटेजवरून लागला. आरोपी सध्या फरार आहेत. ३० मे २०१४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अविनाश आठवले, कोंडीराम गुलाब हतागडे, राहुल सीताराम येडे व मयत श्यामराव लक्ष्मण चौगुले (५०) या चौघांनी गोलापांगरी गावातील देशी दारूच्या दुकानात मद्यप्राशन केले. त्यावेळी श्यामराव चौगुलेच्या खिशात ३ ते ४ हजार रुपये होते. ही रक्कम त्यांच्याकडून हिसकावून घेण्यासाठी तिघांनी श्यामरावला दुधना नदीच्या पात्रात नेले. पात्रात नेल्यानंतर त्यांना तिघांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत श्यामराव गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. मारहाण करणारे अविनाश आठवले, कोंडीराम हतागळे व राहूल येडे पळून गेले. दुपारी १ वाजेच्या सुमारास मारहाण केल्यानंतर हा प्रकार सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. गावातील एक जण सायंकाळच्यावेळी नदीच्या पात्रात गेला असता त्याला श्यामराव चौगुले जखमी अवस्थेत दिसले. त्यांनी याप्रकरणाची माहिती गावातील काही लोकांना दिली. नातेवाईकांनी जखमी श्यामराव यांना तात्काळ जालना येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. तर अधिक उपचारासाठी १ जून रोजी औरंगाबाद येथील घाटी दवाखान्यात हलविण्यात आले. औषधोपचार सुरू असतांना ४ जूनच्या पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ३० मेच्या दुपारी देशी दारूच्या दुकानात बसविण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेर्‍याचे फुटेज तपासून तिघा आरोपींची चौकशी करण्यास सुरूवात केली. मात्र श्यामराव चौगुले यांचे निधन होताच संबंधित तिघेही गावातून गायब झाले. पोलिस त्यांचा तपास करीत असल्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठलचंद्र काळे यांनी सांगितले. याप्रकरणी मयताचा भाचा नंदकुमार मेहेत्रे यांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलिस ठाण्यात तिघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.दुसर्‍या घटनेत कामगाराचा खूनजालना : येथील औद्योगिक वसाहत भागात चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना ३ जून रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. एका स्टील कामगारांची निवासस्थाने असलेल्या या परिसरात दोन कामगार शौचासाठी गेले होते. त्यात मूळचे गेंगटा (ता.बासी, जि. सिद्धार्थनगर) येथील मोलू भारत मौर्या व गंगाबिदा (ता.रजोली जि. नवाडा, बिहार) येथील संजय गुलाबीप्रसाद यादव या कामगारांचा समावेश होता. दोन चोरटे मोटारसायकलवरून त्याठिकाणी आले. चोरट्यांनी धारदार शस्त्राने वार करून संजय यादव यांचा खून केला. तर मोलू मौर्या यालाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर खिशातील एक हजार रुपये घेऊन पसार झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.