शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधात अडसर असलेल्या पतीचा काढला काटा

By admin | Updated: June 11, 2016 00:15 IST

औरंगाबाद : मुकुंदवाडी स्टेशन परिसरातील राजनगरातील विलास दादाराव आव्हाड (४०) याच्या खुनाचे गूढ उकलण्यात अखेर मुकुंदवाडी पोलिसांना शुक्रवारी यश आहे.

औरंगाबाद : मुकुंदवाडी स्टेशन परिसरातील राजनगरातील विलास दादाराव आव्हाड (४०) याच्या खुनाचे गूढ उकलण्यात अखेर मुकुंदवाडी पोलिसांना शुक्रवारी यश आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने विलासचा पत्नी संगीता आव्हाड (३५) हिने प्रियकर शेख गफ्फार शेख गणी (३२, रा. देवळाई) याच्या मदतीने खून केल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी संगीता आणि गफ्फार या प्रेमीयुगुलाला बदनापूर परिसरातून मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली.कारवाईबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले की, ३ जून रोजी विलास आव्हाडचे प्रेत चिकलठाणा शिवारातील दहीहंडे वस्तीजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये पुरलेले आढळून आले होते. दहा दिवसांपूर्वी खून झालेला असल्याने हे प्रेत अक्षरश: कुजून गेले होते. तपासात हा खून पत्नी संगीतानेच केल्याचे निष्पन्न झाले. अनैतिक संबंधातून हा खून झालेला असावा आणि तिचा प्रियकर गफ्फार व मुलगा किशोरही यात सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती. मात्र, प्रकार उघडकीस आल्यापासून आरोपी फरार होते. तीन दिवसांपूर्वी विलास आव्हाडचा मुलगा किशोर मुकुंदवाडी पोलिसांच्या हाती लागला. त्यापाठोपाठ शुक्रवारी फरार संगीता आणि तिचा प्रियकर शेख गफ्फारही पोलिसांच्या हाती लागला. या दोघांनाही अटक करण्यात आली.प्रेमासाठीच केली हत्याआरोपी संगीता आणि शेख गफ्फार या दोघांचे गेल्या चार वर्षांपासून अनैतिक संबंध होते. गफ्फार हा वाळूचा व्यवसाय करतो. त्याच्या ट्रॅक्टरवर संगीताचा पती विलास काम करायचा. त्यामुळे गफ्फारचे आव्हाड यांच्या घरी येणे- जाणे होते. त्यातूनच त्याचे संगीतासोबत सुत जुळले आणि अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. ही बाब विलासच्या लक्षात आल्यानंतर त्याने पत्नी संगीताला विरोध दर्शविला. त्यातून त्यांच्यात खटके उडू लागले. विलास अनैतिक संबंधात अडसर ठरू लागल्याने संगीताने गफ्फारच्या मदतीने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला अन् मग ‘त्या’ रात्री ठरल्याप्रमाणे तिने पतीच्या जेवणात विष कालविले आणि शुद्ध हरपल्यानंतर पतीला घेऊन ती रिक्षाने चिकलठाण्यातील आपल्या शेडवर आली. आधीच तेथे गफ्फार येऊन थांबला होता. मग दोघांनी गळा दाबून विलासचा उरलासुरला जीव काढून घेतला. नंतर खड्डा खोदून शेडमध्येच त्याला पुरले, असे तपासात समोर आले आहे. दोन्ही आरोपींनीही तशी पोलिसांसमोर कबुली दिली. वडिलांच्या खुनाबाबत किशोरला संपूर्ण कल्पना असल्याचे तपासात समोर आले असल्याचे पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांनी सांगितले. फौजदार कल्याण शेळके व त्यांचे सहकारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.