सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयाची रवानगी कोठडीत

By Admin | Updated: July 3, 2016 00:38 IST2016-07-02T23:59:35+5:302016-07-03T00:38:14+5:30

चौसाळा : पत्नीला नांदवण्यास पाठवत नाही म्हणून शुक्रवारी धोतरा येथे उत्तम भाऊराव पवार (८०, वाघेबाभूळगाव, ता. केज) यांचा जावयानेच खून केला होता.

In the custody of the son-in-law of murdering his father-in-law | सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयाची रवानगी कोठडीत

सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयाची रवानगी कोठडीत


चौसाळा : पत्नीला नांदवण्यास पाठवत नाही म्हणून शुक्रवारी धोतरा येथे उत्तम भाऊराव पवार (८०, वाघेबाभूळगाव, ता. केज) यांचा जावयानेच खून केला होता. जावयाला न्यायालयाने सात जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
रामकिसन लक्ष्मण माळी (धोतरा) असे त्या जावयाचे नाव आहे. त्याची पत्नी दीड वर्षांपासून माहेरी वाघेबाभूळगाव येथे राहते. तिला रामकिसन माळी यांनी परत आणण्याचा प्रयत्न केला; परंतु ती आली नाही. त्यामुळे त्याच्या मनात राग होता. त्याचे सासरे उत्तम पवार हे नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी धोतरा येथे आले होते. लग्न आटोपल्यानंतर रामकिसनने सासऱ्याला चहाच्या निमित्ताने शेतात नेले. तेथे त्यांना काठीने मारहाण केली. त्यात ते जागीच मृत्युमुखी पडले. (वार्ताहर)

Web Title: In the custody of the son-in-law of murdering his father-in-law