शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप

By admin | Updated: August 2, 2014 01:32 IST

पालम : शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने चालू हंगामासाठी शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांना वेळेवर मदत झाली आहे.

पालम : शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने चालू हंगामासाठी शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांना वेळेवर मदत झाली आहे. पालम तालुक्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांमधून दरवर्षी खरिपाच्या हंगामासाठी पीककर्ज दिल्या जाते. शेतकऱ्यांना शेतातील पेरणीसाठी बी बियाणे, रासायनिक खते व औषधांसाठी पीककर्जाच्या रकमेचा उपयोग होत असतो. ऊस, हळद, केळी, कापूस यासह विविध पिकांसाठी कर्ज दिल्या जाते. मागील महिन्यापासून शेतकरी पीककर्जाचे प्रस्ताव तयार करीत रांगा लावत आहेत. महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे यासाठी प्रयत्न केले. यामुळे शेतकऱ्यांना तब्बल २ कोटी रुपयांचे पीककर्ज आतापर्यंत वाटप करण्यात आले आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांचे प्रस्ताव घेऊन पीककर्जाचे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेने पुढाकार घेतला आहे. या बँकेपाठोपाठ स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पालम शाखेनेही पीक कर्ज वितरित केले आहे. ग्रामीण बँकेतील अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे जवळपास ३०० शेतकऱ्यांना २ कोटी रुपयांचे पीक कर्ज मिळण्यास मदत झाली आहे. यासाठी शाखा व्यवस्थापक हाडबलवार, क्षेत्रीय अधिकारी वासरीकर, लेखापाल रामगीरवार, उत्तरवार, महाराज आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांना ठेंगा तालुक्यातील इतर राष्ट्रीयीकृत बँकामधून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले जात आहे. स्टेट बँक आॅफ हैदराबादच्या शाखेने मात्र शेतकऱ्यांना ठेंगा दाखविला आहे. यावर्षी या बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाकडे दुर्लक्ष केले आहे. या बँकेतील शाखा व्यवस्थापक रजेवर गेल्याने पीक कर्ज वाटपाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. यामुळे परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. एसबीआय बँकेला गाव जोडावेपालम तालुक्यातील शेतकऱ्यांना दत्तक बँका पीककर्जाचे वाटप करीत आहेत. परंतु आरखेड हे गाव पीककर्जापासून वंचित राहिलेले आहे. हे गाव एचडीएफसी बँकेला दत्तक देण्यात आले आहे. या बँकेची शाखा पालम शहरात नाही. यामुळे ४० कि.मी. हेलपाटे करून गंगाखेड शहर गाठण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे पीक कर्ज काढण्यासाठी शेतकरी या बँकेकडे जात नाहीत. शेतातील कामे सोडून हेलपाटे मारण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असल्याने आरखेड येथील शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत. आरखेड हे गाव स्टेट बँकेच्या पालम शाखेला दत्तक देण्याची आवश्यकता आहे. याकडे जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.