शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIDMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
3
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
4
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
5
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
6
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
7
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
8
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
9
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
10
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
11
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
12
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
13
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
14
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
15
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
16
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
17
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
18
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
19
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
20
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू

By admin | Updated: May 22, 2014 00:17 IST

जालना : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या घाणेवाडी जलाशयाची जलवाहिनी मंगळवारी कन्हैय्यानगरजवळ पुन्हा फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

जालना : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या घाणेवाडी जलाशयाची जलवाहिनी मंगळवारी कन्हैय्यानगरजवळ पुन्हा फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरात नवीन जालना भागास घाणेवाडी जलाशयातून तर जायकवाडी - जालना योजनेद्वारे जुना जालना भागास पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु, दोन्ही योजनेतील काही अडचणींमुळ ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रकार होत आहेत. मंगळवारी सकाळी घाणेवाडीची जलवाहिनी कन्हैय्यानगर भागाजवळ जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. जालना शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी घाणेवाडी येथून दोन जलवाहिन्या आहेत. यापैकी एक निजाम कालीन तर ३० वर्षे जुनी आहे. घाणेवाडीतून पाणीपुरवठा सुरु केल्यानंतर दोन पैकी एक जलवाहिनी नादुरुस्त आढळून आली होती. तिची दुरुस्ती अद्याप केलेली नाही. निजाम कालीन जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरु होता. मंगळवारी ही जलवाहिनीही नादुरुस्त झाली. तिच्या दुरुस्तीचे काम बुधवारी नगर पालिकेने हाती घेतले. मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांनी जलवाहिनीची पाहणी केली. (प्रतिनिधी) बुधवारी पालिकेच्या दुरुस्ती पथकाने घाणेवाडीतून येणारे पाणी थांबवून दुरुस्ती चालू केली. नागरिकांनी जलवाहिनी फोडल्याने तसेच काही पाईप्स जीर्ण झाल्याने जलवाहिनी फुटत आहे. काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने गळती रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली होती. परंतु सध्या हे पथक कुठे गेले, हे कळेनासे झाले आहे. शहरातील अंतर्गत जलवाहिनींच्या कामांबाबतही पालिकेने लवकरच सुरूवात करावी, अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे.