CoronaVirus : आनंदवार्ता ! बायजीपुरा येथील १५ वर्षीय मुलगा कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 15:45 IST2020-05-03T15:44:56+5:302020-05-03T15:45:22+5:30

कोरोनामुक्त मुलाची रुग्णलयातून सुटी करण्यात आली

CoronaVirus: Good news! 15-year-old boy from Baijipura is corona free | CoronaVirus : आनंदवार्ता ! बायजीपुरा येथील १५ वर्षीय मुलगा कोरोनामुक्त

CoronaVirus : आनंदवार्ता ! बायजीपुरा येथील १५ वर्षीय मुलगा कोरोनामुक्त

औरंगाबाद : बायजीपुरा येथील १५ वर्षीय मुलगा अखेर कोरोनामुक्त झाला आहे. या मुलाला रविवारी दुपारी जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

शहरात बायजीपुऱ्यातील एक १७ वर्षीय मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सदर मुलगा १० एप्रिल रोजी खाजगी रुग्णवाहिकेने मुंबईहून आई-वडिलांसह शहरात दाखल झाला होता. त्याची आई गरोदर असल्याने प्रसूतीसाठी ते औरंगाबादेत आले होते. मुंबईहुन आल्याने मनपाने तिघांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले होते. यात मुलाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, तर नंतर त्याच्या गरोदर आईचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली होती. त्यानंतर या १५ वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा मुलगा या पॉझिटिव्ह महिलेचा दुसरा मुलगा आणि १७ वर्षीय पॉझिटिव्ह मुलाचा लहान भाऊ आहे. यापूर्वी हे दोघे कोरणामुक्त झाले आहे. आता हा १५ वर्षीय मुलगाही कोरोनामुक्त झाला.

Web Title: CoronaVirus: Good news! 15-year-old boy from Baijipura is corona free