शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus In Aurangabad : कोरोनाने लक्षणे बदली; औरंगाबादमधील नमुने तपासणीसाठी पाठविले पुण्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 19:45 IST

कोरोनाने लक्षणे बदलल्यामुळेच औरंगाबादपेक्षा धुळे आणि जळगाव येथील मृत्यूदराचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते आहे.

ठळक मुद्देनांदेड आणि औरंगाबादमधील कोरोना नेमका कुठल्या देशाशी साधर्म्य साधणारा ?जळगाव आणि धुळ्यात  लागण झालेल्या रुग्णांच्या विषाणूचे नमुने घातक

औरंगाबाद : शहरात कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रसार होत असून विषाणूची लक्षणे बदलू लागली आहेत. जळगाव आणि धुळ्यात  लागण झालेल्या रुग्णांच्या विषाणूचे नमुने घातक असून औरंगाबादमधील नमुनेदेखील पुणे येथील व्हायरॉलॉजी लॅबला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. 

कोरोनाची लागण संपर्कातून होत आहे. त्यामुळे लागण झालेल्या रुग्णांच्या स्वॅबच्या नमुन्यांचे विश्लेषण करून ठरेल की नेमका तो विषाणू इतर राज्यांप्रमाणे उपद्रवी आहे की,  दुबई, चीन किंवा इतर देशांतील रुग्णांना झाल्यासारखा आहे. कोरोनाने लक्षणे बदलल्यामुळेच औरंगाबादपेक्षा धुळे आणि जळगाव येथील मृत्यूदराचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते आहे. नांदेड आणि औरंगाबादमधील कोरोना नेमका कुठल्या देशाशी साधर्म्य साधणारा आहे, याची माहिती पुढे येण्यासाठी पुण्यातील लॅबमधून तपासणी होणे गरजेचे असल्यामुळे येथील विषाणूचे नमुने लॅबला पाठविले आहेत. कोरोनाची साधर्म्यता लक्षात आल्यानंतर उपचारासाठी आणखी पावले उचलले जातील, असे डॉ. येळीकर यांनी सांगितले.

सुरुवातीला कोविडबाबत कमी माहिती होती. परिस्थितीतून सर्व शिकता आले आहे. एका विशिष्ट वयाच्या नागरी लोकसंख्येत मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. २७६ मृत्यूचे विश्लेषण केले आहे. वय आणि इतर आजार असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. शेवटच्या टप्प्यातच रुग्ण उपचारासाठी समोर येत असल्यामुळे शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत. मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी मेडिसिन आणि आयसीयू विभागातील उपचार पद्धतीची माहिती यावेळी दिली.

तीन दिवसांत मृत्यूंचे प्रमाण जास्तपहिल्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापर्यंत मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे उपचारास संधी मिळत नाही. फुफ्फुसात मोठ्या प्रमाणात विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपचारास प्रतिसाद मिळत नाही. १९.५ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा औरंगाबादचा दर आहे. जे.जे. हॉस्पिटल आणि कस्तुरबा रुग्णालयापेक्षा अधिक स्वॅब टेस्ट येथे होत आहेत. ३५ हजार ३६७ टेस्ट आजवर केल्या असून ५ मशिन्स त्यासाठी कार्यरत असल्याचा दावा डॉ. येळीकर यांनी केला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद