औरंगाबाद : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दिवसभरात २४ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ४८ जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४६ हजार ७६३ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत ४५ हजार ३९० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एक हजार २३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या २४ रुग्णांत मनपा हद्दीतील २०, ग्रामीण भागातील ४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ४१ आणि ग्रामीण भागातील ७, अशा एकूण ४८ रुग्णांना रविवारी सुट्टी देण्यात आली.
मनपा हद्दीतील रुग्ण
जाधववाडी १, पैठण रोड १, शहानूरवाडी १, म्हसोबानगर १, नक्षत्रवाडी १, अन्य ५, रामतारा कॉलनी १, गजानन मंदिर, गारखेडा १, श्रेयनगर १, एन चार, सिडको १, शिवाजीनगर १, घाटी परिसर १, सिल्क मिल कॉलनी १, चेतनानगर ३
ग्रामीण भागातील रुग्ण
केकटजळगाव, पैठण १, शिवाजीनगर, कन्नड १, अन्य २