CoronaVirus : औरंगाबादेत आणखी ८ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या २८२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 17:40 IST2020-05-03T17:39:28+5:302020-05-03T17:40:15+5:30

रविवारी सकाळी १७ अहवाल आले होते पॉझिटिव्ह

Corona virus: 8 more positive in Aurangabad, total 282 patients | CoronaVirus : औरंगाबादेत आणखी ८ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या २८२

CoronaVirus : औरंगाबादेत आणखी ८ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या २८२

औरंगाबाद : औरंगाबादेत रविवारी सायंकाळी आणखी ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिवसभरात २६ रुग्णांची भर पडली. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाबाधितांची संख्या आता २८२ झाली आहे. यात गुलाबवाडी येथील ३ आणि संजयनगर-मुकुंदवाडी येथील ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

दरम्यान, औरंगाबादेत कोरोग्रस्तांची साखळी वाढतच आहे. रविवारी सकाळी १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यात मुकुंदवाडी १६ आणि बायजीपुरा येथील १ अशा १७ जणांचा समावेश आहे.

Web Title: Corona virus: 8 more positive in Aurangabad, total 282 patients