शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

‘पाणलोट’चे कंत्राटी कर्मचारी वेतनाविना

By admin | Updated: May 30, 2014 00:35 IST

हिंगोली : आॅनलाईन माहिती भरण्याच्या कारणावरून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातील कंत्राटी कर्मचार्‍यांचे वेतन रखडले आहे.

 हिंगोली : आॅनलाईन माहिती भरण्याच्या कारणावरून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातील कंत्राटी कर्मचार्‍यांचे वेतन रखडले आहे. परिणामी मागील तीन महिन्यांपासून पगाराअभावी काम करणार्‍या ९० कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात राज्यात जवळपास साडेतीन हजार कर्मचारी कार्यरत आहेत. हिंगोली जिल्ह्यात या कर्मचार्‍यांची संख्या ९० असून मागील तीन वर्षांपासून ते कार्यरत आहेत. पाणलोटच्या जनजागृतीपासून ते व्यवस्थापनापर्यंतची कामे हे कर्मचारी करतात. गावागावात जावून कर्मचारी पाणलोटबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतात. योजना चांगल्या रितीने राबविण्यासाठी योग्य तो सल्लाही कर्मचार्‍यांकडून दिला जातो. जिल्ह्यात तीन वर्षांपासून काम करणार्‍या या कर्मचार्‍यांवर मात्र संकट ओढवले आहे. पाणलोट अतंर्गत झालेल्या कामांची आॅनलाईन नोंद (एमआयएस) केली नसल्यामुळे कर्मचार्‍यांचे वेतन रोखण्यात आले आहे. यापूर्वी या कर्मचार्‍यांना कृषी कार्यालयातील संगणकावर आॅलनाईन माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर कार्यालयाऐवजी नेटकॅफेवरून महिती भरण्याचा आदेश कृषी विभागाने दिला. लॅपटॉप किवा संगणक अशी कोणतीही सुविधा न देता आदेश दिल्यामुळे कर्मचारी गोंधळात पडले. कर्मचार्‍यांनी नेटकॅफेवर जावून माहिती भरण्याचा प्रयत्न केला असता नेहमी संकेतस्थळ जाम राहत असल्याची तक्रार आहे. त्यातच कृषी सहाय्यक आणि सुपरवायझरकडून माहिती देण्यात आली नसल्याने कर्मचार्‍यांना संगणकावर माहिती भरता आलेली नाही. परिणामी सलग तीन महिन्यांपासून या कर्मचार्‍यांना वेतनाअभावी काम करावे लागत आहे. पहिल्या महिन्यात वेतन रखडल्यानंतर दुसर्‍याही महिन्यात कर्मचार्‍यांचे वेतन करण्यात आले नाही. विशेष म्हणजे तिसरा महिनादेखील वेतनाविना गेला आहे. वेतनाअभावी या कर्मचार्‍यांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी घरून पैसे मागवावे लागत आहेत. दरम्यान वारंवार वेतनाची मागणी केल्यानंतरही कृषी विभागाकडून त्यांचे वेतन करण्यात आलेले नाही. सध्या या कर्मचार्‍यांचे कामात लक्ष लागत नसून त्यांना वेतनाअभावी आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. कृषी विभागाने कंत्राटी कर्मचार्‍यांचे वेतन लवकर अदा करावे, अशी मागणी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय खिल्लारे, सचिव सोळुंके यांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी पवार यांचा भ्रमणध्वनी लावला असता तो बंद होता. (प्रतिनिधी) जिल्ह्यातील ९० कर्मचार्‍यांना वेतनाची प्रतीक्षा एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात राज्यात जवळपास साडेतीन हजार कर्मचारी कार्यरत असून हिंगोली जिल्ह्यात मागील ३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या ९० आहे. पाणलोट अतंर्गत झालेले कामांची आॅनलाईन नोंद (एमआयएस) केली नसल्यामुळे जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचार्‍यांचे वेतन आले रोखण्यात आले आहे. वारंवार वेतनाची मागणी केल्यानंतरही कृषी विभागाकडून त्यांचे वेतन करण्यात आले नसल्यामुळे सध्या या कर्मचार्‍यांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. लवकर वेतन करावे, अशी मागणी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय खिल्लारे, सचिव सोळंके यांनी केली आहे.