शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIDMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
3
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
4
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
5
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
6
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
7
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
8
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
9
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
10
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
11
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
12
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
13
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
14
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
15
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
16
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
17
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
18
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
19
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
20
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Daily Top 2Weekly Top 5

चिंतन बैठकीतून कानउघाडणी!

By admin | Updated: May 19, 2014 01:07 IST

जालना : लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाच्या

जालना : लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक, पं.स. सदस्यांनी आपापल्या प्रभागात, गणांमध्ये राहून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी सूचना आ. कैलास गोरंट्याल यांनी केली. यावेळी त्यांनी काही नगरसेवकांची कानउघाडणीही केल्याचे समजते. आ. गोरंट्याल यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीत आ. गोरंट्याल यांनी मार्गदर्शन केले. मतदारसंघात करण्यात आलेल्या विकासकामांची जनजागृती करून जनतेमध्ये विश्वास निर्माण करा, असे आवाहन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत गतवेळी जालना विधानसभेतून पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून दिले होते. आजपर्यंत मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली आहेत. राज्य-केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. त्या योजना तळागळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटून काम करावे, असे गोरंट्याल यावेळी म्हणाले. नगरसेवकांनी प्रभागातील रहिवाशांच्या अडीअडचणी जाणाव्यात मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करावेत. नगर पालिकेच्या संपर्कात राहण्याच्या सूचनाही केल्या. या बैठकीत निवडणुकीत काम न करणार्‍या काही कार्यकर्त्यांची कानउघडणी करण्यात आली. जनाधार नसलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यापुढे तोलून-मापून बोलावे, असे सांगण्यात आले. जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजना आणि मोठ्या प्रमाणात शहरातील रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराचे सुशोभिकरण, जिजामाता प्रवेशद्वार, १३ विविध ठिकाणी हायमॅक्स दिले लावण्यात आले. अनेक भागात जलवाहिनीतून नळाचे पाणी पोहोचविण्यात आले. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या १० कोटीतून विविध विकास कामे करण्यात आली. याशिवाय आमदार स्थानिक विकास निधीतूनही जनकल्याणाची कामे केली आहेत. सर्वच नगरसेवकांनी आपल्या भागातील विकास कामांची जनजागृती करून लोकापर्यंत जा, अशी सूचना आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली. राज्य शासनाने घरकुल योजनेचे सर्वेक्षण केले आहे. आता लवकरच कामांना सुरूवात होणार आहे. त्यासाठी नगरसेवकांनी श्रेय लाटणार्‍यांना त्यांची जागा दाखवून आपला मुद्दा उचलून कोणीही स्वत:चे बॅनर लावणार नाही, याची खास काळजी बाळगण्याचे आवाहनही करण्यात आले. (प्रतिनिधी) लोकांपर्यंत पोहोचण्याची सूचना तीन महिन्यांपर्यंत नगरसेवकांनी आपला वॉर्ड सोडून बाहेर न जाण्याचा सल्ला आ. गोरंट्याल यांनी दिला. नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. याशिवाय नळाच्या पाण्याचे नियोजन करून आप-आपल्या वॉर्डातील नागरिकांना पाच-सहा दिवसातून एकदा पाणी मिळेल, याची काळजी घेण्याची सूचना दिली. बैठकीस अपक्ष नगरसेवक उपस्थित गेले दोन दिवस झालेल्या बैठकांमध्ये पहिल्या दिवशी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. रविवारच्या बैठकीत सर्व नगरसेवक व काही अपक्ष नगरसेवकही उपस्थित होते. शहरातील वॉर्डात झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी हालचाली कराव्यात अशी सूचनाही गोरंट्याल यांनी दिली.