शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची वृत्ती चुकीची! दानवेंकडून बिहार पराभवाचे विश्लेषण; महाविकास आघाडीत खदखद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:48 IST

'काँग्रेसची जास्त मागणी, कमी विजय'; अंबादास दानवेंनी बिहारच्या निकालावरून फटकारले, बिहार निकालानंतर महाविकास आघाडीतील अंतर्गत खदखद उघड

छत्रपती संभाजीनगर: बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनच्या झालेल्या पराभवानंतर याचे खापर फोडण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी बिहार आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या पराभवास थेट काँग्रेस पक्षाच्या जागावाटपाच्या मानसिकतेवर बोट ठेवले. दानवे यांनी खदखद जाहीरपणे व्यक्त केल्याने याचे परिणाम राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये एनडीएला २०० जागांवर स्पष्ट बहुमत मिळाल्याचे निश्चित झाल्यानंतर दानवे यांनी वृत्तवाहिनीवर  बोलताना काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. दानवे यांनी बिहारमधील पराभवाचे खापर काँग्रेस आणि आरजेडीच्या चुकांवर फोडले. "पराभव झालेला मान्य आहे, भाजपने सत्तेचा गैरवापर केला हे खरं आहे. पण, त्याचबरोबर तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करायला खूप उशीर झाला," अशी कबुली त्यांनी दिली.

काँग्रेसच्या वृत्तीमुळेच इतर मित्रपक्षांचे नुकसान
काँग्रेसच्या मानसिकतेवर टीका करताना दानवे म्हणाले, "काँग्रेसचं असंच आहे; जागावाटपात काँग्रेसला जास्त जागा, मोठा वाटा हवा असतो, पण प्रत्यक्षात विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं." काँग्रेसच्या या वृत्तीमुळेच इतर मित्रपक्षांचे नुकसान होते, असे मत त्यांनी परखडपणे मांडले. बिहारमधील जागावाटपाचा घोळ आणि महाराष्ट्रातील मागील निवडणुकीतील धोरणांवर त्यांनी थेट तुलना केली. दानवे म्हणाले, "महाराष्ट्रात निवडणुकीवेळी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केले असते आणि जागावाटप आधी केले असते तर राज्यात चित्र वेगळे असते. जी चूक महाराष्ट्रामध्ये झाली तीच चूक बिहारमध्येही झाली आहे. काँग्रेसने आता ही वृत्ती बदलावी."

जागावाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत नको!
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी टिकून राहावी, अशी इच्छा व्यक्त करत असतानाच त्यांनी जागावाटपाच्या वेळकाढूपणावर नाराजी व्यक्त केली. "छोट्या गावांमध्येही जर जागावाटपाची चर्चा शेवटच्या दिवसापर्यंत चालत असेल तर निवडणुकीतली मजा निघून जाते आणि त्याचा परिणाम निकालावर होतो. काँग्रेसवाले मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना थेट 'पंजावर (काँग्रेसच्या चिन्हावर) लढा' सांगतात, हे योग्य नाही. जागावाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत नसायला पाहिजे'', असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress's attitude wrong! Danve analyzes Bihar defeat; unrest in Maha Vikas Aghadi.

Web Summary : Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve blames Congress's seat-sharing attitude for Bihar defeat, creating unrest in Maharashtra's Maha Vikas Aghadi. He criticized Congress for demanding more seats while winning fewer, impacting allies. Danve urges Congress to change this attitude before local elections.
टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBiharबिहारAmbadas Danweyअंबादास दानवे