शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जनांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदी काँग्रेसच्या प्रतिभा पाटील कव्हेकर

By admin | Updated: September 22, 2014 00:55 IST

लातूर : लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या विद्यमान महिला व बालकल्याण सभापती प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचेच अण्णासाहेब पाटील यांची रविवारी निवड झाली़

लातूर : लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या विद्यमान महिला व बालकल्याण सभापती प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचेच अण्णासाहेब पाटील यांची रविवारी निवड झाली़ या निवडीसाठी मतदान होऊन ४१ विरुध्द १३ अशी मते मिळाली़ दरम्यान, मनसेच्या एका सदस्याने काँग्रेसलाच मतदान करुन 'हात' बळकट केले तर राष्ट्रवादीच्या चार सदस्य यावेळी अनुपस्थित राहिले़लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांचा अडीच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने रविवारी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी जिल्हा परिषद सदस्यांची विशेष बैठक जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बोलाविण्यात आली होती़ जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेसची एक हाती सत्ता असून त्यात काँग्रेसचे ३५, राष्ट्रवादीचे ९, भाजपाचे ८, शिवसेनेचे ५ आणि मनसे १ असे पक्षीय बलाबल आहे़अप्पर जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झालेल्या या निवड बैठकीस ५८ पैकी ५४ सदस्य उपस्थित राहिले़ अध्यक्षपदासाठी काटगाव गटातील काँग्रेसच्या विद्यमान महिला व बालकल्याण सभापती प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी आणि हलगरा गटातील भाजपाच्या मधु बिरादार यांनी नामांकनपत्र सादर केले़ तसेच उपाध्यक्षपदासाठी जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा काँग्रेसचे अण्णासाहेब पाटील यांनी आणि शिवसेनेच्या भादा गटातील सविता शिंदे यांनी नामांकनपत्र सादर केले़ हे चारही नामनिर्देशनपत्रे वैध ठरल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले़ काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांना ४१ तर भाजपाच्या बिरादार यांना १३ मते मिळाली़ त्यामुळे अध्यक्षपदासाठीच्या कव्हेकर यांचा विजय झाल्याचे घोषित करण्यात आले़ तसेच उपाध्यक्षपदासाठीचे काँग्रेसचे पाटील यांना ४१ तर शिवसेनेच्या शिंदे यांना १३ मते मिळाली़ त्यामुळे पाटील यांचा निर्विवाद विजय झाला़ही निवड जाहीर झाल्यानंतर माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या आणि अण्णासाहेब पाटील यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करुन आनंदोत्सव साजरा केला़ नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी समर्थकांनी एकच गर्दी केली होती़ त्यामुळे सुट्टीच्या दिवशी शुकशुकाट जाणवणारी जिल्हा परिषद रविवारी मात्र गजबजलेली दिसून आली़