शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:19 IST

कर्जमाफीतील जाचक अटींमुळे शेतकºयांना कर्जमाफी मिळेल की नाही, याची शाश्वतीच नाही. आत्महत्यांच्या घटना वाढतच आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा खा. राजीव सातव यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कर्जमाफीतील जाचक अटींमुळे शेतकºयांना कर्जमाफी मिळेल की नाही, याची शाश्वतीच नाही. आत्महत्यांच्या घटना वाढतच आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा खा. राजीव सातव यांनी दिला आहे.हिंगोलीत शासकीय विश्रामगृहात पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. संतोष टारफे, प्रदेश सचिव अब्दुल हाफीज, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, अ‍ॅड. बाबा नाईक, जि.प. गटनेते दिलीप देसाई, विनायक देशमुख, नारायण खेडकर, बापूराव बांगर, शेख नेहाल हाजी इस्माईल, विलास खाडे, जनार्दन पतंगे, गजानन पोहकर, वनिता गुंजकर यांची उपस्थिती होती.खा. राजीव सातव म्हणाले, समाजातील अनेक घटक केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे नाराज आहेत. परिणामी, शिक्षक, व्यापारी, डॉक्टर, विद्यार्थी, शेतकºयांची आंदोलने होत आहेत. आघाडी सरकारनेही कर्जमाफी केली होती. मात्र शेतकरी कुटुंबांना कधी रांगेत उभे केले नव्हते. भाजप सरकारच्या विरोधातील रोषाला वाचा फोडण्यासाठी आपण प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने जबाबदारी घेऊन समाजातील सर्व घटकांसह शेतकºयांच्या प्रश्नावर प्रत्येक तालुक्यात ११ ते १७ सप्टेंबरदरम्यान आंदोलनाचा इशारा दिला. यात अर्धनग्न, मुंडण, रास्ता रोको, धरणे आंदोलनाचा समावेश राहील.आ. संतोष टारफे म्हणाले, सरकारच्या विरोधात सर्वसामान्यांत रोष असून कर्जमाफीत सध्या होणारी लूट शेतकºयांच्या जिव्हारी लागली आहे. तुरीची खरेदी झाली नाही अन् सोयाबीनच्या अनुदानाचाही पत्ता नाही. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, घरकुल, गणवेश, स्वच्छता अभियानात शौचालय बांधकामाची रक्कम, ठिबक सिंचनचे अनुदान, निराधारा, वीज, उच्चशिक्षण आदी योजनांसाठी सरकारकडे पुरेसा निधी नाही. यामुळे विकास कामे ठप्प पडली असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत आंदोलनाचे तालुकानिहाय नियोजन केले. यावेळी श्यामराव जगताप, नंदकिशोर तोष्णीवाल, डॉ. रवि पाटील गोरेगावकर, डॉ. सतीश पाचपुते, कैलास साळुंके, भगवान खंदारे, संजय राठोड, असद कादरी, रमेश जाधव, जिया कुरेशी, संतोष राजे गोरे, फारुख बागवान, भागोराव राठोड, अरुण वाढवे, प्रशांत गायकवाड, धनंजय पाटील, केशव नाईक, दत्ता कदम, प्रा. पारडकर, सतीश खाडे, विलास गोरे, विक्रम पतंगे, विश्वास बांगर, दिलीप होडवे, आरेफलाला, शेख आलीम, मुजीब कुरेशी आदीची उपस्थिती होती.