विद्यापीठ निवडणुकीत महिला उमेदवारांबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:12 IST2021-02-05T04:12:22+5:302021-02-05T04:12:22+5:30

औरंगाबाद : विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या दोन जागांसाठी १२ फेब्रुवारीला विद्या परिषदेच्या सदस्यांमध्ये निवडणूक होणार आहे. तथापि, विद्या परिषदेवर निवडून ...

Confusion about women candidates in university elections | विद्यापीठ निवडणुकीत महिला उमेदवारांबाबत संभ्रम

विद्यापीठ निवडणुकीत महिला उमेदवारांबाबत संभ्रम

औरंगाबाद : विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या दोन जागांसाठी १२ फेब्रुवारीला विद्या परिषदेच्या सदस्यांमध्ये निवडणूक होणार आहे. तथापि, विद्या परिषदेवर निवडून गेलेल्या ८ सदस्यांपैकी एक पुरुष व एक महिला या निवडणुकीसाठी पात्र असतात. मात्र, दुसरीकडे विद्या परिषदेच्या नामनिर्देशित महिला सदस्यादेखील ही निवडणूक लढवू शकतात, असा सदस्यांचा सूर असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

व्यवस्थापन परिषदेत २२ सदस्य असतात. त्यामध्ये अधिसभेतून ८ जागा व विद्या परिषदेतून २ जागा निवडून येतात, तर कुलपती व कुलगुरूंकडून नामांकनाद्वारे १० जागा भरल्या जातात. व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष कुलगुरू आणि कुलसचिव हे पदसिद्ध सचिव असतात. डॉ. शंकर अभोरे व डॉ. सय्यद शरफून निहार यांच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशान्वये कुलपती तथा राज्यपालांनी डॉ. शंकर अभोरे यांचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्यत्व रद्द केले, तर अलीकडे सहा महिन्यांपूर्वी लॉकडाऊनमध्ये डॉ. सय्यद शरफून निहार या सेवानिवृत्त झाल्या आहेत. या दोन जागांसाठी १२ फेब्रुवारी निवडणूक होणार आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या आदेशान्वये निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. २२ ते ३० जानेवारीदरम्यान निवडूक अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. १ फेब्रुवारीला अर्जांची छाननी होईल. विद्या परिषदेच्या १२ फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत मतदान घेण्यात येणार असून त्याच दिवशी दुपारी निकाल जाहीर करण्यात येईल.

चौकट.....

दोन्ही पॅनेलकडून निवडणूक प्रतिष्ठेची

उत्कृष पॅनेल व विद्यापीठ विकास मंच या दोन्ही पॅनेलने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत विद्यापीठ उत्कृष पॅनेलचे डॉ. राजेश करपे व विद्यापीठ विकास मंचचे किशोर शितोळे यांनी दावा केला आहे की, या निवडणुकीत आमचेच उमेदवार निवडून येतील. त्यादृष्टीने व्यूहरचना आखली जाईल. दुसरीकडे, विद्या परिषदेत थेट निवडणुकीद्वारे निवडून आलेल्या ८ उमेदवारांमध्ये दोन महिलांचा समावेश असून त्या दोघीही उत्कृष पॅनलच्या आहेत. त्यामुळे महिलेची जागा बिनविरोध येऊ शकते, असे डॉ. करपे यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे कायद्याचा चुकीचा अर्थ लावण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. विद्या परिषदेतील नामनिर्देशित महिला सदस्यही ही निवडणूक लढवू शकते, असे काहीजणांचे म्हणणे आहे. त्यामुळे तूर्तास तरी याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Confusion about women candidates in university elections