सहकार न्यायालयासाठीच्या लढ्याची परिपूर्ती

By Admin | Updated: July 27, 2014 01:14 IST2014-07-27T00:08:47+5:302014-07-27T01:14:02+5:30

लातूर : गेल्या अनेक वर्षांपासून सहकार न्यायालयासाठी सुरु असलेल्या लातूरकरांच्या लढ्याची आज परिपूर्ती झाली़

The completion of the fight for the cooperative court | सहकार न्यायालयासाठीच्या लढ्याची परिपूर्ती

सहकार न्यायालयासाठीच्या लढ्याची परिपूर्ती

लातूर : गेल्या अनेक वर्षांपासून सहकार न्यायालयासाठी सुरु असलेल्या लातूरकरांच्या लढ्याची आज परिपूर्ती झाली़ नांदेड रोडवरील भूविकास बँकेच्या इमारतीत या न्यायालयाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले़ यावेळी उद्घाटक मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के़ के़ तातेड यांनी न्यायदानाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रत्येक विभागासह वकिलांचे सर्वतोपरी सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले़
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र सहकारी अपिल न्यायालय मुंबईचे अध्यक्ष एस़ बी़ सावळे होते़ मंचावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के़ आऱ श्रीराम, जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड़ आण्णाराव पाटील, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सीलचे सद्स्य अ‍ॅड़ बळवंत जाधव, सहकार न्यायालयाचे पहिले न्या़ व्ही़ एस़ यादव यांच्यासह न्यायमूर्ती व्ही़ डी़ डोंगरे, न्यायमूर्ती व्ही़ बी़ कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती़़
न्या़ तातेड पुढे म्हणाले, सहकार क्षेत्राचा विकास चांगल्याप्रकारे करण्याची एक चांगली संधी वकिलांच्या हाती आली आहे़ सहकारचा विकास म्हणजे सामाजिक विकास होय़ हा विकास वकिलांच्या सहभागाशिवाय होणे शक्य नाही़ प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष ही विकास प्रक्रिया वकिलांमुळेच यशस्वी होत़़े़़ न्यायदानाची प्रक्रिया सुटसुटीत, गतिमान व पारदर्शक करण्याचे काम वकिलांच्या हातात असते़ सहकार क्षेत्रातील वाद लवकर निकाली निघाले तर याचा फायदा सहकार क्षेत्राला होऊ शकतो़ त्यामुळे न्याय व्यवस्थेवरील विश्वास आणखीन मजबुत होण्यास मदत होईल़ लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांतील प्रकरणांसाठी लातूर हे सोईचे असल्याचे ते म्हणाले़
प्रास्ताविक अ‍ॅड़ अण्णाराव पाटील यांनी केले़ सुत्रसंचालन अ‍ॅड़ शैलेश गोजमगुंडे, अ‍ॅड़ शुभांगी जोशी यांनी केले़ आभार न्या़ आऱ एऩ दांडगे यांनी मानले़ यशस्वीतेसाठी अ‍ॅड़ जगन्नाथ चिताडे, अ‍ॅड़ विशाल दीक्षित, अ‍ॅड़ उदय गवारे, अ‍ॅड़ गणेश
गोमचाळे, अ‍ॅड़ बालाजी पांचाळ, अ‍ॅड़ महेंद्र इंगळे, अ‍ॅड़ प्रदीप पाटील, अ‍ॅड़ गणेश यादव़, अ‍ॅड़ छाया मलवाडे, अ‍ॅड़ अजय हांडे, अ‍ॅड़ सरिता मोरे आदींनी परिश्रम घेतले़

Web Title: The completion of the fight for the cooperative court